Join us  

शिळ्या पोळ्यांचा टेस्टी पदार्थ, फक्त दहा मिनिटांत होणारा रोटी सामोसा! चवीला मस्त आणि पोळ्याही संपतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 1:58 PM

Roti Samosa From Leftover Rotis: उरलेल्या पोळ्या कशा संपवायचा असा प्रश्न कधी- कधी पडतोच.. त्याचंच हे बघा एक मस्त उत्तर. सामोसे असे यम्मी होतील की पटापट पोळ्या संपतील (food and recipe).

ठळक मुद्देलहान मुलांना डब्यात देण्यासाठी तसेच इव्हिनिंग स्नॅक्स म्हणूनही हा पदार्थ उत्तम आहे. 

कधी- कधी सकाळी केलेल्या बऱ्याच पोळ्या संध्याकाळच्या जेवणासाठी असतात. पण पुन्हा पोळी- भाजी खाण्याचा खूपच कंटाळा आलेला असतो. शिळ्या पोळ्यांचा तोच तो नेहमीच्या पद्धतीने केलेला कुस्कराही नकोसा वाटतो. बरं मग दुसरं काही करावं, तर पोळ्या उरतील, वाया जातील याचं टेन्शन असतंच. म्हणूनच या एका मस्त पदार्थाची रेसिपी (Tasty yummy roti samaosa from leftover chapati) माहिती करून घ्या. उरलेल्या पोळ्या (baasi roti) कशा संपवायच्या याचं टेन्शनच राहणार नाही. झटपट होणारी ही सोपी रेसिपी इन्स्टाग्रामच्या agarnishbowl या पेजवर शेअर करण्यात आली आहे. लहान मुलांना डब्यात देण्यासाठी तसेच इव्हिनिंग स्नॅक्स (How to make roti samosa?) म्हणूनही हा पदार्थ उत्तम आहे. 

 

कसा बनवायचा रोटी सामोसा?साहित्य१. उरलेल्या पोळ्या

२. पनीर

"सपने मे मिलती है...", नवरा- नवरीने केला लग्नमंडपातच सत्या स्टाइल दणक्यात डान्स, व्हायरल व्हिडीओ 

३. मेयोनीज

४. चीज

५. तेल, टोमॅटो सॉस आणि काही मसाले.

 

रेसिपी १. सगळ्यात आधी तर पोळीचे अर्धे- अर्धे दोन भाग करून घ्या. एका भागाचा एक सामोसा तयार होतो.

२. आता एका कढईमध्ये तेल टाकून गरम करून घ्या. त्यात पनीर, टोमॅटो सॉस तसेच इतर काही वेगवेगळे तुमच्या आवडीचे सॉस टाका, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, थोडंसं मीठ टाका आणि पनीर छान परतून घ्या.

अभिनेत्री भाग्यश्री करतेय केटलबेल स्विंग, नेमका हा व्यायाम आहे कसा आणि काय त्याचे फायदे?

३. आता पोळीच्या एका अर्ध्या भागावर मेयोनीज लावून घ्या. मेयोनीज कोणतंही तुमच्या आवडीच्या फ्लेवरचं घेऊ शकता.

४. त्यावर फ्राय केलेलं पनीर टाका. थोडं चीज किसून टाका. आणि सामोस्याप्रमाणे त्याची त्रिकोणी आकारात गुंडाळी करा. 

५. त्याला दोन्ही बाजूंनी बटर लावा आणि मग सॅण्डविज मेकरमध्ये ठेवून ते भाजून घ्या.

६. गरमागरम रोटी सामोसा तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.