चहाला वेळ नसते पण वेळेला मात्र चहा हवाच! असं तुम्ही अनेकदा असेल. पाऊस असो किंवा थंडी सगळ्यात पहिल्यांदा चहाची आठवण येते. चहा लवर्स कोणत्याही वेळी चहा पिण्यास तयार असतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा चहा आवडतो. कोणाला चहात आलं घातलेलं आवडत नाही तर कोणाला वेलची. रोजचा चहा बनवताना त्यात बदल केला तर नेहमीच्या चहापेक्षा दुप्पट चव येऊ शकते. जर तुमचंही चहाशी एक वेगळं बॉन्डिंग असेल तर चहाशी संबंधित या 5 टिप्स माहित असायला हव्यात. चहाची चव आणखी चांगली करण्यासाठी या टिप्स नक्की ट्राय करून पाहा
१) मसाल्यांना मिक्सरमध्ये वाटण्याऐवजी कुटून घ्या
चहामध्ये बरेच लोक आले, वेलची, तुळस वगैरे औषधी वनस्पती वापरतात. काहीजण आले किसून त्यात चहा घालतात, पण चहामध्ये ती अनोखी चव आणायची असेल तर फक्त एक गोष्ट करण्याची गरज आहे. या तीन गोष्टी एकत्र छान कुटून उकळत्या पाण्यात घालाव्या लागतात. आपल्याला तुळशीचा चहा आवडत नसेल तर त्याऐवजी 2 लवंगा आणि दालचिनीचा तुकडा बारीक करा.
२) सुकलेल्या लिंबाचा वापर
सुकलेल्या लिंबाची चहामध्ये चव फार चांगली येते. लेमन टी तयार करताना मसाल्यात याचा वापर केला जातो. वास्तविक पाहता अरेबीक चहामध्ये वाळलेल्या लिंबाचा वापर केला जातो आणि ही एक अतिशय लोकप्रिय पद्धत आहे. पाण्यात चहा पावडर उकळवून घ्या आणि त्यात सुकलेल्या लिंबाच्या दोन फोडी घाला, चांगला उकळ आल्यानंतर त्यात साखर घाला, दुध घालायचं असेल तर शेवटी घाला.
३) साखरेला पर्याय
साखरयुक्त चहा हा आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही. रिफाईन साखरेऐवजी इतर काही स्वीटनर वापरणे नेहमीच चांगले ठरते. आपण चहामध्ये इतर स्वीटनरर्सचा वापर करू शकता. मध, ब्राउन शुगर, गुळ या पदार्थांचा वापर साखरेला पर्याय म्हणून करता येऊ शकतो.
४) चहा पावडरमध्ये वेलची आणि लवंग घालू नका
आपल्यापैकी बरेचजण चहाच्या पानातच लवंगं आणि वेलची घालतात. जेणेकरून आपल्याला आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या वस्तू काढाव्या लागणार नाहीत. त्यामुळे अनेकदा चहा पावडर आणि लवंग-वेलची या दोन्हींच्या सुगंधावर परिणाम होतो. म्हणून हे जिन्नस स्वतंत्रपणे ठेवून वापरा. चहाच्या योग्य चवीसाठी ही एक महत्वाची टिप आहे.
५) चहा घट्ट बनवण्यासाठी टिप
रस्त्याच्या कडेला चहा बनवत असलेल्या एखाद्या व्यक्तीला पाहिल्यास लक्षात येईल. चहा अधिक स्वादिष्ट तो बनविण्यासाठी हातात मोठा चमचा घेऊन तो वर-खाली उचलतो आणि त्याच वेळी चहा वेगवेगळ्या भाड्यांमधून मिक्स करतो. हा चहाला चविष्ट बनवण्याचा मार्ग आहे. यामुळे चहा जाडसर होते आणि छान बबल्स येतात. या सर्व टिप्स आपल्या दैनंदिन चहाला अधिक स्वादिष्ट बनविण्यासाठी फायदेशीर ठरतील. नक्की ट्राय करून पाहा.