Join us

आता भाजणीशिवाय करा खमंग-खुसखुशीत थालीपीठ! सकाळी नाश्ता भारी तर दिवस लै भारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2025 16:38 IST

Thalipith Recipe : Pohyache Talipith : Poha Thalipith : Instant Thalipeeth Recipe : Easy Breakfast Recipe : नाश्त्याला पटकन तयार होणारे इन्स्टंट थालीपीठ करण्याची झटपट रेसिपी...

सकाळच्या नाश्त्याला पोहे, उपमा यांसोबतच थालीपीठ देखील आवडीने खाल्ले जाते.  थालीपीठ म्हटलं की आपल्याला आठवते ती भाजणी. खमंग, खुसखुशीत थालीपीठ करायच म्हटलं की भाजणी लागतेच. अनेक घरात थालीपिठासाठीची (Thalipith Recipe) भाजणी ही तयार करून ठेवली जाते. या भाजणीचा वापर करून अगदी १० ते १५ मिनिटांत थालीपीठ (Poha Thalipith) झटपट तयार करता येते. परंतु काहीवेळा आपल्याला तेच ते भाजणीचे थालीपिठ (Instant Thalipeeth Recipe) खाऊन कंटाळा येतो किंवा कधी अचानक भाजणी संपते, अशावेळी नेमकं थालीपीठ कसं तयार करावं, असा प्रश्न पडतो(Easy Breakfast Recipe).

परंतु आपण भाजणीशिवाय देखील नाश्त्याला झटपट तयार होणारे थालीपीठ तयार करु शकतो. कपभर भिजवलेले पोहे, ज्वारी व गव्हाचे पीठ वापरुन आपण नाश्त्याला पटकन तयार होणारे इन्स्टंट थालीपीठ तयार करु शकतो. सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला भाजणीशिवाय तयार होणारे थालीपीठ कसे तयार करायचे याची रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. पोहे - १ कप (भिजवलेले)२. ज्वारीचे पीठ - १/२ कप ३. गव्हाचे पीठ - १/२ कप ४. बेसन - २ टेबलस्पून ५. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)६. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून ७. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून ८. पांढरे तीळ - १ टेबलस्पून ९. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१०. मीठ - चवीनुसार ११. तेल - २ ते ३ टेबलस्पून १२. हळद - १/२ टेबलस्पून १३. पाणी - गरजेनुसार 

पीठ एक पदार्थ अनेक, इडली-डोसे-उत्तपे-आप्पे करा काहीही, पाहा मल्टिपर्पज पिठाची रेसिपी...

हिवाळ्यात स्वस्त मिळतात मटार, घरी ‘असे’ करा फ्रोजन मटार, रंग आणि स्वाद वर्षभर टिकेल...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका मोठ्या डिशमध्ये भिजवलेले पोहे हातांनी दाब देत मळून घ्यावेत. २. आता या मॅश करून घेतलेल्या पोह्यांमध्ये ज्वारी, गव्हाचे पीठ व बेसन घालावे. ३. त्यानंतर या पिठात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं - लसूण पेस्ट, हळद , पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालावे. 

हिरव्यागार मटारचे पौष्टिक आप्पे - हिवाळ्यातला खास चविष्ट बेत, करायलाही एकदम सोपा बेत...

४. आता थोडेसे तेल व पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. ५. त्यानंतर एक कॉटनचा पातळ रुमाल पाण्यांत भिजवून पोळपाटावर व्यवस्थित पसरवून घ्यावा. या रुमालावर तयार पिठाचा एक मोठा गोळा घेऊन ओल्या  हाताने हलकेच दाब देत गोलाकार चपातीप्रमाणे थापून घ्यावा. थालीपीठ थापून झाल्यानंतर त्याच्या बरोबर मधोमध बोटांनी ३ ते ४ छोटी छिद्र करून घ्यावीत. ६. आता पॅनवर थोडेसे तेल किंवा तूप सोडून त्यावर हे थालीपीठ घालून दोन्ही बाजुंनी खरपूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यावे. 

भाजणीशिवाय खरपूस, खमंग चवीचे थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. हे गरमागरम थालीपीठ दही किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.