Lokmat Sakhi >Food > हातही न लावता अगदी झटपट लसूण सोलण्याच्या ४ ट्रिक्स, किलोभर लसूणही सोलून होईल झटपट...

हातही न लावता अगदी झटपट लसूण सोलण्याच्या ४ ट्रिक्स, किलोभर लसूणही सोलून होईल झटपट...

The Best 4 Way to Easily Peel Garlic : अगदी २ मिनिटांत सोप्या ट्रिक्स वापरुन सोला ढिगभर लसूण, साठवून ठेवायलाही जाईल सोपे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 09:05 PM2023-05-18T21:05:07+5:302023-05-18T21:19:30+5:30

The Best 4 Way to Easily Peel Garlic : अगदी २ मिनिटांत सोप्या ट्रिक्स वापरुन सोला ढिगभर लसूण, साठवून ठेवायलाही जाईल सोपे...

The 4 Most Easiest Method To Peel Garlic | हातही न लावता अगदी झटपट लसूण सोलण्याच्या ४ ट्रिक्स, किलोभर लसूणही सोलून होईल झटपट...

हातही न लावता अगदी झटपट लसूण सोलण्याच्या ४ ट्रिक्स, किलोभर लसूणही सोलून होईल झटपट...

लसूण हा स्वयंपाकात अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. एखाद्या पदार्थाला लसणाची खमंग फोडणी दिली तर तो अधिकच स्वादिष्ट लागतो. लसूण खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. महाराष्ट्रीयन स्वयंपाकात लसणाचा हमखास वापर केला जातो. पालेभाज्या, लोणचं, चटणीसारख्या पदार्थांमध्ये भरपूर लसणाच्या पाकळ्या वापरल्या तरच ते पदार्थ चविष्ट होतात. मात्र स्वयंपाकासाठी एवढा लसूण वारंवार सोलणं हे एक डोकेदुखीचं काम असतं. एकतर लसणाला उग्र वास येतो शिवाय लसूण सोलताना आपली बोटंही दुखू लागतात. बाजारात सोललेला लसूण विकत मिळतो. मात्र तो फारच महाग असतो.

भारतीय पद्धतीचे जेवण तयार करायचे म्हटले तर ते लसूण शिवाय तयार होणेच शक्य नाही. लसणाचा वापर कच्चा व शिजवून दोन्ही पद्धतीने केला जातो.आरोग्यासाठी सुद्धा लसूण बराच फायदेशीर मानला जातो.कांदा, लसूण हे प्रकार तर आपण वारंवार खरेदी करत नाही. लसूण, कांदा आपण एकत्र खरेदी करुन साठवून ठेवतो, पण ते खरेदी केल्यावर नीट साठवून ठेवणं फार गरजेचं असतं, नाहीतर तर ते सडून खराब होऊ शकतात. त्याचबरोबर स्वयंपाकाचा वेळ वाचावा यासाठी आपण काहीवेळा लसूण एकदम सोलून ठेवतो परंतु लसूण सोलून ठेवणे हे कंटाळवाणे काम वाटते. अशावेळी आपण काही सोप्या ट्रिक्स वापरुन झटपट लसूण पाकळ्या सोलून त्या साठवून ठेवू शकतो(The 4 Most Easiest Method To Peel Garlic).

लसूण पाकळ्या झटपट सोलण्याच्या काही सोप्या ट्रिक्स :- 

१. सर्वप्रथम लसणाचा कांदा मोकळा करून घ्यावा. लसूण पाण्यात भिजवून थोडा नरम होतो. पण लसणाची सालं आपोआप निघायला हवी असतील तर हे पाणी थोडं कोमट करून घ्यावे . या पाण्यात थोडा बेकिंग सोडा (बेकिंग सोडा पर्यायी आहे, नाही घातला तरी चालतो.) घालून १५ ते २० मिनिट मोकळ्या केलेल्या लसूण पाकळ्या यात भिजवून ठेवाव्यात. यानंतर लसूण सोलताना नखांचा वापर करण्याऐवजी दोन बोटांच्या मध्ये पकडून चिमटीने साल काढून घ्यावी. लसणाच्या सालीचा बारीक थर राहिला असल्यास तो हातांनी चोळून बाजूला काढावा.

टोमॅटोची पावडर करून ठेवा, आणि वर्षभर भाजी - आमटीला वापरा, पाहा कशी करायची पावडर... 

कोथिंबीर १५ दिवस राहणार एकदम फ्रेश- हिरवीगार, निवडण्याचीही गरज नाही, बघा सोपा उपाय..

२. लसूण सोलण्याची ही पद्धत अगदी सोपी आणि साधी आहे. सोशल मीडियावर ही युक्ती  व्हायरल झाली आहे. या पद्धतीत आपल्या घरातील एखाद्या टोकदार चाकूने लसूण सोलू शकता. यासाठी फक्त चाकू लसणाच्या पाकळ्यांमध्ये घालून ती पाकळी सोलायची आहे.

३. लसूण सोलणं ही कंटाळवाणी गोष्ट असल्यामुळे तुम्हाला ते सहज सोलून मिळावे असं वाटत असतं. मायक्रोवेव्हमध्ये लसूण सोलणं अगदी सोपं आहे. यासाठी मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंदासाठी लसूण ठेवा. ज्यामुळे ते अगदी पटकन सोलले जातील.  

३. जर आपल्याला एकाच वेळी भरपूर लसूण सोलायचा असेल तर ही पद्धत अगदी मस्त आहे. यासाठी तुम्हाला फक्त एका रिकाम्या डब्यात लसणाच्या पाकळ्या भरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर डब्याचं झाकण लावा आणि तो डबा पाच ते सहा मिनीटे वेगाने हलवा. या पद्धतीमुळे लसूण अगदी सोप्या पद्धतीने सोलला जाईल.

४. लसणाचा कांदा मोकळा करून घ्या. एक तवा गरम करा. यावर थोडे मीठ टाकून घ्या व यावर लसणाच्या मोकळ्या पाकळ्या टाका. १ ते २ मिनिट लसूण परतून घेतल्यावर गॅस बंद करा. अलगद तुम्हाला सालं पटापट वेगळी करता येतील.

Web Title: The 4 Most Easiest Method To Peel Garlic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.