पिवळा धम्मक छोटासा 'लिंबू' हा आपल्या स्वयंपाक घरातला सगळ्यांत महत्वाचा पदार्थ. कांदेपोहे, मिसळ, पावभाजी, वरण - भात यांसारख्या काही विशिष्ट पदार्थांवर लिंबू पिळून खाल्ल्यास त्या पदार्थांची चव अप्रतिम लागते. आपल्या भारतीय थाळीमध्ये देखील इवल्याशा लिंबाच्या फोडीला खूप महत्वाचं स्थान असत. काही पदार्थ बनवताना तर काही बनवून झाल्यावर त्यावर लिंबू पिळला जातो. काही पदार्थ हे लिंबाशिवाय अपूर्णच आहेत(How to Squeeze the Most Juice Out of a Lemon).
लिंबू हे रोजच्या स्वयंपाकात वापरलेच जाते म्हणून आपण आठवडाभराचे लिंबू एकदाच आणून ठेवतो. हे लिंबू आपण आणले की फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवतो. अनेकदा लिंबू फ्रिजमधून काढल्या काढल्याही त्याचा भरपूर रस (This Hack Gets The Most Juice Out Of Limes & Lemons) येत नाही. याचं कारण म्हणजे लिंबाच्या रसामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पेक्टिन आणि सेल्युलोज असतात. तापमान थंड असलं की हे कार्बोहायड्रेट्स अधिक घट्ट बनतात, त्यामुळे कमी रस येतो. यासोबतच काहीवेळा बाजारातून विकत आणलेल्या लिंबाची साल ही जाड (6 Ways To Get The Most Juice From Your Limes) असते तर कधी लिंबू सुकल्यामुळे (6 Ways To Get The Most Juice From Your Limes) त्यातून रस फारसा निघत नाही. विकत आणलेल्या महागड्या लिंबातून पाहिजे तसा रस निघाला नाही तर काही गृहिणींची चिडचिड होते. अशावेळी काही सोप्या टिप्सचा वापर करून लिंबातून अधिकाधिक रस काढायचा कसा यासाठीच्या काही टिप्स समजून घेऊयात(The Best 6 Trick's For Getting The Most Juice Out Of Your Lemons).
लिंबातून अधिकाधिक रस कसा काढावा ?
१. लिंबू जर कडक झालं असेल, वाळलं असेल तर एक वाटीभरून पाणी घ्या. त्या पाण्यात सुकलेलं, कडक झालेलं लिंबू टाका. ही वाटी फ्रिजमध्ये ठेवून द्या. १० ते १५ मिनिटांनी वाटी बाहेर काढा. लिंबाला जरा मऊपणा आला असेल. आता हे लिंबू तुम्ही कापून पिळलं तर नक्कीच चांगला रस निघेल.
२. सहसा लिंबू कापताना आपण तो आडवा धरुन बरोबर मधोमध कापतो. परंतु असे न करता लिंबू कापताना तो आडवा न धरता उभा धरावा. याचबरोबर तो कापताना बरोबर मधोमध न कापता मध्य सोडून थोडा बाजूला कापावा. या अर्ध्या कापलेल्या लिंबाची पुन्हा फोड करताना तो मध्यभागी न कापताना पुन्हा मध्य सोडून थोडा पुढे कापावा. असे केल्यानंतर सगळ्यांत शेवटी लिंबाच्या मध्यभागी असणारा जाडा भाग सुरीने कापून घ्यावा. असे केल्यास लिंबातून अधिकाधिक रस काढता येऊ शकतो.
ड्रायफ्रुट्सचे काप करणं किचकट काम, खूप वेळ लागतो ? २ सोप्या ट्रिक्स, झटपट करा भरपूर पातळ काप...
कुकरमध्ये केक बनवताना ५ चुका टाळा ! बेकरीसारखा मस्त सॉफ्ट, लुसलुशीत केक होईल झटपट तयार...
३. जर लिंबू वाळून कडक झालेलं नसेल, पण जरा सुकलेलं असेल तर हा उपाय चांगला ठरेल. यासाठी एक वाटी गरम पाणी घ्या. या पाण्यात लिंबू ठेवा. एखाद्या मिनिटाने काढून घ्या आणि नंतर पिळा.
४. सुकलेला पण कडक न झालेला लिंबू आपण मायक्रोव्हेवमध्ये ठेवून १० सेकंदासाठी गरम केला तरी त्यातून जास्त रस निघण्यास मदत होते.
वडापावच्या गाड्यावर मिळते तशी सुकी लाल चटणी घरी बनवण्यासाठी वापरा १ सिक्रेट पदार्थ, चव अशी की...
५. लिंबू किंवा मोसंबी या फळांमधून अधिक रस यावा यासाठी ही फळे कापण्याआधी जमिनीवर किंवा ओट्यावर, टेबलवर ठेवा आणि तळहाताने हलकासा दाब देऊन ती जमिनीवर गोल गोल फिरवा यामुळेही फळांमधून रस येण्याचे प्रमाण वाढते.
६. जर आपण लिंबू जास्त काळासाठी स्टोअर करुन ठेवणार असाल तर नेहमी ताजे, पातळ सालीचे लिंबू खरेदी करावे. कारण जाड सालीच्या लिंबांपेक्षा ते अधिक चांगले रसदार असतात. त्यामुळे लिंबू खरेदी करताना त्याची साल पातळ आहे का हे पाहुन मगच ते खरेदी करावेत.
अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...