Join us  

धो धो पावसात कुरकुरीत पालक-बटाटा भजी खाण्यासारखं सुख नाही, खमंग भजी करण्याची पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2024 5:21 PM

The Best Ever Spinach Potato Onion Pakora; check out Crispy recipe : पालक - बटाट्याची क्रिस्पी भजी कशी करायची?

पाऊस पडला की गरमागरम भजी खाण्याची इच्छा प्रत्येकाला होते (Pakoda). भजी अनेक प्रकारची केली जाते. बटाटा, कांदा, पालक किंवा इतर भाज्यांची भजी केली जाते. कांदा - बटाट्याची भजी आपल्याकडे आवडीने खाल्ली जाते (Monsoon). पण आपण कधी पालक - बटाट्याची भजी खाऊन पाहिली आहे का? पालक - बटाट्याची भजी करणं तशी सोपी (Spinach Potato Pakora).

काही वेळात झटपट तयार होते. यासाठी आपल्याला विशेष मेहनत घ्यावी लागणार नाही. झटपट काही मिनिटात पालक - बटाट्याची भजी तयार होतील (Food). शिवाय आपणही भजी खास टिफिनसाठीही देऊ शकता (Cooking Tips). पालक - बटाट्याची भजी करण्याची योग्य पद्धत कोणती? पाहूयात(The Best Ever Spinach Potato Onion Pakora; check out Crispy recipe).

पालक - बटाट्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

पालक

बटाटा

बेसन

हिरवी मिरची

व्यायामाला वेळच नाही, जेवणही वेळेवर नाही? करा ५ सोपे बदल, बिझी असूनही वजन पटकन घटेल

हळद

लाल तिखट

ओवा

जिरं

आलं - लसूण पेस्ट

मीठ

कोथिंबीर

तांदुळाचं पीठ

बेकिंग सोडा

कृती

सर्वात आधी बटाट्याचे साल काढून, किसून घ्या. एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बारीक चिरलेली पालक घाला. नंतर त्यात एक वाटी बेसन, बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, ओवा, जिरं, आलं - लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.

कपभर गव्हाच्या पीठाचे करा चमचमीत धिरडे; शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय, १५ मिनिटांत चमचमीत पदार्थ

नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा. शेवटी २ चमचे तांदुळाचे पीठ आणि चिमुटभर खायचा सोडा घालून मिक्स करा. अशा प्रकारे आपलं भज्यांचे बॅटर तयार.

दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बॅटरचे छोटे गोळे सोडून तळून घ्या. अशा प्रकारे क्रिस्पी पालक बटाट्याची भजी खाण्यासाठी रेडी. पाऊस पडल्यानंतर आपण या भजीचा आस्वाद नक्कीच लुटू शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स