Join us  

रात्री उरलेल्या शिळ्या पुऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळीही राहतील ताज्या - मऊ, ४ सोप्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2024 12:51 PM

How to refresh leftover fried puri : The best way to reheat puri : उरलेल्या पुऱ्या दुसऱ्या दिवशी खाताना त्या मऊ आणि नरम राहण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवूयात.

श्रावण महिना आला की सणावाराला सुरुवात होते. या महिन्यांत भरपूर सण, उत्सव आपण आनंदाने साजरे करतो. या वेगवेगळ्या सणांदरम्यान आपण वेगवेगळे पदार्थ तयार करतो. प्रत्येक सणानुसार आपल्याकडे अनेक पारंपरिक पदार्थ केले जातात. यासोबतच या सणांना खास नैवेद्य देखील केला जातो. सणवार असला की आपण काहीतरी विशेष (How to heat poori) असे साग्रसंगीत जेवणाचा बेत आखतो. या खास जेवणाच्या मेन्यू मध्ये पुरी असतेच. पुरी, भाजी, श्रीखंड, खीर, वरण - भात असे अनेक पदार्थ तयार केले जातात (The best way to reheat puri).

सणवार असल्यावर हमखास सगळ्यांच्या घरी पुरी केली जाते. ही पुरी आपण भाजी किंवा खीर, श्रीखंडासोबत अगदी आवडीने खातो. पुरी छान, पातळ, मऊ, मुलायम आणि टम्म फुगलेली असेल तरच खायला मज्जा येते. याउलट पुरी जर जाड, किंवा फुगलेली नसेल वातड लागत असेल तर अशी पुरी कुणालाच खायला आवडत नाही. श्रावण महिन्यांत सणवार असल्याने (How to refresh leftover fried puri without oven) अनेकदा आपल्या घरी पुरीचा बेत केला जातो. काहीवेळा या पुऱ्या जास्त प्रमाणात तयार केल्या जातात. अशा उरलेल्या जास्तीच्या पुऱ्या आपण दुसऱ्या दिवशी खातो. परंतु दुसऱ्या दिवशी या पुऱ्या खाताना वातड किंवा कडक होतात. असे होऊ नये म्हणून उरलेल्या पुऱ्या दुसऱ्या दिवशी खाताना त्या मऊ आणि नरम राहण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवूयात(How to refresh leftover fried puri).

उरलेल्या पुऱ्या वातड किंवा कडक होऊ नये म्हणून... 

१. वाफेवर गरम कराव्यात :- जर फार मोठ्या प्रमाणावर पुऱ्या उरलेल्या असतील तर त्या आपण वाफेवर गरम करु शकता. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित गरम करुन घ्यावे. आता या गरम पाण्यावर एक चाळण ठेवून या चाळणीत या पुऱ्या ठेवून द्याव्यात त्यानंतर वरून झाकण ठेवून द्यावे. अशाप्रकारे आपण ५ ते १० मिनिटांसाठी या पुऱ्या वाफेवर गरम करुन घ्याव्यात. भांड्यातील गरम पाण्याची वाफ लागून या पुऱ्या लगेच गरम होतील. भांड्यातील पाण्याच्या वाफेने या पुऱ्या गरम होतील. त्यानंतर या पुऱ्या चाळणीतून काढून थोड्यावेळासाठी हवेवर तशाच ठेवून द्याव्यात. 

उपवासाचे फराळाचे पदार्थ करण्यासाठी कोणतं तेल वापरावं? शेफ रणवीर ब्रार सांगतात ' हे ' तेल बेस्ट...

२. मायक्रोवेव्हचा करा वापर :- कडक किंवा वातड पुरी मऊ करण्यासाठी आपण मायक्रोवेव्हचा वापर करु शकता. यासाठी उरलेल्या पुऱ्या एका मोठ्या डिशमध्ये काढून ठेवाव्यात. डिशमध्ये काढून ठेवलेल्या या पुरीवर थोडासा ओला करुन घेतलेला कॉटनचा रुमाल घालावा. त्यानंतर २० ते ३० सेकंदांसाठी  मायक्रोवेव्हमध्ये या पुऱ्या गरम करुन घ्याव्यात. ओल्या रुमालाचा वापर केल्याने पुरीत ओलावा टिकून राहून त्या मऊ होतील. या ट्रिकचा वापर करुन तुमच्या उरलेल्या पुऱ्या खाण्यायोग्य होतील. 

३. पॅनमध्ये करा गरम :- उरलेल्या पुऱ्या आपण पॅनमध्ये देखील गरम करु शकता. यासाठी एक पॅन घेऊन तो गॅसच्या मंद आचेवर ठेवून गरम करून घ्यावा. नंतर पॅनमध्ये थोडं तूप घालावे. त्यानंतर पॅनमध्ये पुऱ्या ठेवा आणि दोन्ही बाजूंनी हलकेच गरम करुन घ्यावे. जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या नाहीतर पुऱ्या कडक होऊ शकतात.

काहीतरी गोड खावेसे वाटते,  सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगते, १ सोपी रेसिपी - गोड आणि पौष्टीक...

४. ॲल्युमिनियम फॉइल :- आदल्या दिवशी उरलेल्या पुऱ्या जर दुसऱ्या दिवशी खायच्या असतील तर अशा पुऱ्या गरम करण्यासाठी आपण ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करु शकता. मायक्रोवेव्ह ५ ते १० मिनिटांसाठी प्रीहिट करुन घ्यावा. या प्रिहिट मायक्रोवेव्हमध्ये ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळलेल्या पुऱ्या ५ मिनिटांसाठी ठेवून रिहिट करुन घ्याव्यात. या ट्रिकमुळे तुमच्या पुऱ्या पुन्हा मऊ आणि खाण्यायोग्य होतील.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स