स्वयंपाक घरात कांद्याचा वापर जास्त होतो. काही लोकांना जेवताना देखील चिरलेला कांदा खाण्याची सवय असते. कांद्याच्या भावात चढ - उतार होत असते. त्यामुळे काही लोकं कांदा साठवण्याच्या दृष्टीने अधिक प्रमाणात आणून ठेवतात. कांदा, लसूण, बटाटे हे पदार्थ साठवून ठेवता येतात. ते अधिक महिने टिकतात.
मात्र, जर एखादा कांदा खराब निघाला तर, संपूर्ण साठवून ठेवलेले कांदे सडण्याची शक्यता निर्माण होते. कांद्याची साठवणूक करताना त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. कांदा जास्त दिवस टिकावा असे आपल्याला वाटत असेल तर, काही टिप्स फॉलो करा. यामुळे कांदा अधिक महिने टिकतील. व सडण्याची शक्यता देखील कमी होईल(The Best Way to Store Onions).
कांदा कोरड्या जागी साठवून ठेवा
कांदा साठवून ठेवण्याची जागा कोरडी असावी. कारण आपल्याला कांदे अधिक महिने साठवून ठेवायचे आहे. कांदा हवेशीर कोरड्या जागेवर साठवून ठेवा. कारण जर कांद्याने ओलावा पकडला तर, कांदा खराब होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे कांदा साठवून ठेवण्यासाठी हवेशीर कोरडी जागा निवडा.
उन्हाळ्यात करा नाचणीचे घावन, पौष्टिक नाचणी पोटासाठी थंड आणि घावन चविष्ट-लुसलुशीत
थंड ठिकाणी ठेवा
कांदा साठवून ठेवण्यासाठी थंड व कोरडी जागा निवडा. जर जागा थंड नसेल तर, कांदा ओलावा पकडेल. खोलीचा तापमान जर जास्त असेल तर कांदे खराब होऊ शकतात. या ओलाव्यामुळे कांदे फुटतात किंवा कुजायला लागतात.
कमी प्रकाश असणाऱ्या जागेवर कांदे साठवून ठेवा
कांद्यांना थंड, कोरड्या, आणि ज्या ठिकाणी जास्त उजेड नसेल त्या ठिकाणी साठवून ठेवा. यामुळे कांदा ओलावा पकडणार नाही. कांदा खूप उन्हात किंवा खूप दमट, ओलसर भागात ठेवल्यास त्यांना कोंब फुटतात.
करा काकडीचे गरमागरम पौष्टिक थालीपीठ, करायला सोपे आणि चवीला मस्त खमंग
कांदा जाळीच्या टोपलीमध्ये साठवून ठेवा
कांदे नेहमी जाळीच्या टोपलीमध्ये साठवून ठेवा. भांडे धुतल्यानंतर आपण जी जाळी वापरतो, त्या जाळीमध्ये कांदे साठवून ठेवल्यास उत्तम ठरेल. किंवा प्लास्टिकच्या टोपलीमध्ये साठवून ठेवले तरी चालते.
कांदा विकत घेताना या गोष्टी लक्षात ठेवा..
- ओलसर कांदे विकत घेऊ नका, जर घेतल्यास त्यांचा वापर पहिले करा.
- ज्या कांद्याचे वरचे टरफल एकदम कोरडे असतात, ते कांदे साठविण्याच्या दृष्टीने योग्य असतात.
मोजून १० मिनिटांत करा कोकण स्टाइल खोबरं-लसणाची चटणी, पारंपरिक लसणीचं तिखट करऱ्याची रेसिपी
- कांदा घेताना जर त्यातून थोडा जरी वास येत असेल, तर तो कांदा विकत घेऊ नका. कारण तो आतून सडलेला असू शकतो.
- कांद्याचे देठ तपासून बघा. जर देठाला हिरवे कोंब आले असेल तर, ते कांदे साठविण्याच्या दृष्टीने चांगले नाही. त्याचा वापर त्वरित करावा.
- वरच्या बाजूने काळपट गुलाबी दिसणारा कांदा आतून खराब असण्याची शक्यता असते. त्यामुळे वरच्या बाजूने गुलाबी, फ्रेश रंग असणारेच कांदे घ्या.