बॉलीवूडचा किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) सध्या डंकी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'पठाण', 'जवान' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर प्रेक्षक त्याच्या 'डंकी' चित्रपटासाठी उत्सुक आहे. शाहरुख हा डाऊन टू अर्थ कलाकार असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. त्याने सुरुवातीच्या काळात स्टेज परर्फोमन्स देत सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. शिवाय कॉलेजच्या दिवसात तो स्ट्रीट फूड आवडीने खात असल्याचं त्याने एका मुलाखतीत म्हटलंय.
कॉलेजच्या कॅटीननध्ये तो चहासोबत ब्रेड पकोड्याचा (Bread Pakora) आस्वाद लुटायचा. जर तुम्ही शाहरुख खानचे कट्टर फॅन असाल तर, एकदा ब्रेड पकोडा घरी तयार करून खा (Cooking Tips). कॅटीनस्टाईल ब्रेड पकोडा घरी कसा तयार करायचा? पाहूयात(The Don SRK Loves His College Bread Pakoda).
ब्रेड पकोडा करण्यासाठी लागणारं साहित्य
बटाटा
लाल तिखट
मीठ
हळद
गरम मसाला
पोळ्या उरल्या तर फेकू नका, मुठभर शेंगदाणे घालून करा चमचमीत फोडणीची पोळी, पौष्टीक रेसिपी-करायला सोपी
बेसन
हिंग
ओवा
ब्रेड
तेल
पाणी
कृती
सर्वप्रथम, बटाट्याची भाजी तयार करा. यासाठी एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे घ्या. त्यात लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, अर्धा चमचा गरम मसाला घालून साहित्य हाताने मिक्स करा. दुसऱ्या एका बाऊलमध्ये एक कप बेसन, एक चमचा लाल तिखट, चिमुटभर हळद, हिंग, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा आणि पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा.
ना बेसन-ना पाण्याचा एकही थेंब, पाहा कुरकुरीत कोथिंबीर वडी करण्याची नवी पद्धत-जिभेची चव वाढेल
ब्रेडवर बटाट्याची भाजी लावून त्यावर दुसरा ब्रेड ठेवा. त्याला सुरीने आडवे कापून त्याचे दोन भाग करा. दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. ब्रेड बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून गरम तेलात सोडा, व दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे शाहरुख खान फेवरीट ब्रेड पकोडा खाण्यासाठी रेडी.