Lokmat Sakhi >Food > हात न लावता गरमागरम बटाटे सोला दोन मिनिटात; १ जबरदस्त ट्रिक; हातही पोळणार नाहीत

हात न लावता गरमागरम बटाटे सोला दोन मिनिटात; १ जबरदस्त ट्रिक; हातही पोळणार नाहीत

The Easiest Way to Peel a Boiled Potato Without a Peeler; 1 best trick : बटाटे सोलण्याची पाहा युनिक ट्रिक; वेळखाऊ काम होईल चटकन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2024 05:47 PM2024-10-07T17:47:28+5:302024-10-07T17:48:45+5:30

The Easiest Way to Peel a Boiled Potato Without a Peeler; 1 best trick : बटाटे सोलण्याची पाहा युनिक ट्रिक; वेळखाऊ काम होईल चटकन..

The Easiest Way to Peel a Boiled Potato Without a Peeler; 1 best trick | हात न लावता गरमागरम बटाटे सोला दोन मिनिटात; १ जबरदस्त ट्रिक; हातही पोळणार नाहीत

हात न लावता गरमागरम बटाटे सोला दोन मिनिटात; १ जबरदस्त ट्रिक; हातही पोळणार नाहीत

बटाटा (Potato Peeler) हा एक असा पदार्थ आहे, जी प्रत्येक पदार्थात फिट होतो (Kitchen Tips). बटाट्याचे पदार्थ सगळ्यांना आवडतात. काही जण बटाटे उकडून किंवा तळून बटाटा खातात (Cooking Tips). बहुतांश स्नॅक्समध्ये जसे की, वडा पाव, पावभाजी, पाणी पुरी, मसाला डोसा, पराठा अशा पदार्थांमध्ये बटाट्याचा (Potatoes) वापर उकडवूनच केला जातो. मात्र, बटाटे उकडल्यानंतर, त्याला थंड करण्यासाठी ठेवले जाते. थंड झाल्यानंतर त्याची साल काढली जाते. याची प्रोसेस अनेकदा वेळखाऊ वाटते. बटाटे सोलण्यासाठी बराच वेळही जातो. शिवाय हात पोळतात ते वेगळंच.

बटाट्याची साल काढताना हाताला चटके बसत असतील. शिवाय बटाटे सोलताना बराच वेळ जात असेल तर, एक शॉर्टकट ट्रिक फॉलो करून पाहा. या शॉर्टकट ट्रिकचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये मिनिटात बटाटे सोलायचे कसे? याची ट्रिक दिली आहे(The Easiest Way to Peel a Boiled Potato Without a Peeler; 1 best trick).

पंखा पुसूनही डाग तसेच? धुळीने माखलेला पंख स्वच्छ करण्यासाठी १ खास ट्रिक; मिनिटात पंखा स्वच्छ

बटाटे सोलताना आता हाताला चटके बसणार नाहीत कारण..


किचन हॅकचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापैकी काही खरोखर उपयुक्त ठरतात. तर काही फ्लॉप असतात. पण बटाटा सोलण्याची ही ट्रिक आपल्या नक्कीच मदतीला येईल.

किचनमधील 'हे' ५ पदार्थ कधीही खराब होत नाही, कालबाह्य म्हणून अजिबात फेकून देऊ नका; योग्य साठवून ठेवा

या व्हिडिओमध्ये एक महिला गरम बटाटे सोलण्याची अनोखी पद्धत दाखवत आहे. गरम बटाटे उकडून घेतल्यानंतर त्याचे २ भाग करा. आता पुरी तळण्यासाठी वापरण्यात येणारे झारा घ्या. झारा उलटा करून घ्या, त्यावर अर्धा बटाटा ठेवा, आणि हलक्या हाताने दाब द्या. यामुळे बटाट्याची साल झाऱ्यावर आणि उकडलेला बटाटा एका बाऊलमध्ये पडेल. बटाटा सोलण्याची ही ट्रिक आपल्याला नक्कीच आवडेल. या किचन हॅकमुळे मिनिटात बटाटे सोलून मॅशही होतील.

Web Title: The Easiest Way to Peel a Boiled Potato Without a Peeler; 1 best trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.