Lokmat Sakhi >Food > बटाटे नीट उकडत नाहीत? पाहा 'ही' योग्य पद्धत, हातही न लावता सोलता येतील...

बटाटे नीट उकडत नाहीत? पाहा 'ही' योग्य पद्धत, हातही न लावता सोलता येतील...

The Easiest Way To Peel & Boil Potatoes : How To Easily Peel Boiled Potatoes : How To Boil & Peel Potatoes Quickly : आत्तापर्यंत तुम्हीपण चुकीच्या पद्धतीने बटाटे उकडवत होतात, पहा झटपट बटाटे उकडण्याची नवी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2024 12:24 PM2024-11-07T12:24:16+5:302024-11-07T12:25:18+5:30

The Easiest Way To Peel & Boil Potatoes : How To Easily Peel Boiled Potatoes : How To Boil & Peel Potatoes Quickly : आत्तापर्यंत तुम्हीपण चुकीच्या पद्धतीने बटाटे उकडवत होतात, पहा झटपट बटाटे उकडण्याची नवी ट्रिक...

The Easiest Way To Peel & Boil Potatoes How To Easily Peel Boiled Potatoes How To Boil & Peel Potatoes Quickly | बटाटे नीट उकडत नाहीत? पाहा 'ही' योग्य पद्धत, हातही न लावता सोलता येतील...

बटाटे नीट उकडत नाहीत? पाहा 'ही' योग्य पद्धत, हातही न लावता सोलता येतील...

बटाट्याचे अनेक पदार्थ तयार करताना काहीवेळा बटाटा उकडवून घ्यावा लागतो. पराठा, पावभाजी, भेळ असे वेगवेगळे पदार्थ करायचं म्हटलं की बटाटा आधी आपण उकडवून घेतो. बटाटा उकडवून घेण्यासाठी शक्यतो आपण बटाट्याचे दोन तुकडे करून किंवा न कापताच ते कुकरमध्ये लावून ३ ते ४ शिट्ट्या काढतो. परंतु या पद्धतीने बटाटे उकडवून घेतल्यास काहीवेळा ते व्यवस्थित उकडवले जात नाहीत, तर कधी खूप जास्त उकडून पचपचीत होतात. याचबरोबर या उकडलेल्या बटाट्यांची सालं काढणे म्हणजे फारच किचकट आणि वेळखाऊ काम असते(How To Easily Peel Boiled Potatoes).

बटाटे थोडे गरम असतानाच सालं काढली तर हात भाजण्याची शक्यता असते. तसेच उकडवून घेतलेल्या बटाट्याच्या साली देखील पटकन सहज निघत नाहीत. काहीवेळा घाई गडबडीत असताना आपल्याकडे या उकडवून घेतलेल्या बटाट्याची सालं (How To Boil & Peel Potatoes Quickly) काढण्यासाठी पुरेसा वेळ देखील नसतो. अशावेळी आपण बटाटे उकडवून घेण्यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर करु शकतो. ही ट्रिक वापरून आपण उकडलेल्या बटाट्याची सालं अगदी पटकन काढू शकतो. बटाटे उकडवण्याची ही नवी सोपी ट्रिक कोणती ते पाहूयात(The Easiest Way To Peel & Boil Potatoes).

बटाटे उकडवण्याची सोपी पद्धत... 

बटाटे उकडवण्यासाठी सर्वात आधी आपण ते दोन भागात कापून मग उकडवून घेतो. परंतु असे केल्याने बटाटे काहीवेळा व्यवस्थित न उकडता कच्चे राहतात तर कधी जास्त शिजून पचपचीत होतात. यासाठी बटाटे उकडताना ते दोन भागात संपूर्णपणे न कापता अर्धेच कापून घ्यावे. यासाठी बटाटे एका सपाट पृष्ठाभागावर ठेवून एका हातात बटाटा धरुन तो हलकेच गोलाकार आकारात पुढे सरकत नेत सुरीच्या मदतीने अलगद कापावा.

बटाटे उकडण्यापासून लसूण सोलण्यापर्यंत स्वयंपाकघरातल्या ‘या’ ९ कामांसाठी मायक्रोवेव्हचा करा वापर, स्वयंपाक होईल झटपट

त्यानंतर हा अर्धा हलकेच कापून घेतलेला बटाटा गरम पाण्यांत उकडवण्यासाठी ठेवावा. १० ते १५ मिनिटानंतर बटाटा उकडल्यानंतर तो चिमट्याच्या मदतीने गरम पाण्यातून काढून लगेच बर्फाच्या गार पाण्यांत टाकावा. एका बाऊलमध्ये बर्फ आणि पाणी घेऊन त्या पाण्यात हा बटाटा टाकल्यास बटाट्याची सालं लगेच  सहजपणे निघण्यास मदत होते. 

वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी नेमकं कोणतं तेल वापरावं? तज्ज्ञ सांगतात योग्य तेल निवडण्याची पद्धत...

गार पाण्यांत उकडलेला बटाटा टाकल्यावर २ ते ३ मिनिटे या पाण्यांत बटाटा असाच भिजत ठेवावा. त्यानंतर बटाटयाच्या बरोबर मध्यभागी आपण जिथे हलकेच कापून घेतले आहेत, तो भाग दोन्ही हातांनी ट्विस्ट अँड टर्न केल्यास या बटाट्याची सालं अगदी पटकन सहजपणे निघेल. ही ट्रिक वापरल्याने सालं सोलण्यासाठी फारसा वेळ घालवावा लागणार नाही.    

वाळून कडक झालेले डाळिंब सोलण्याची ट्रिक, दाणे निघतील सरसर आणि रसही गळणार नाही...

अशाप्रकारे आपण ही बटाटे उकडवण्याची नवी सोपी पद्धत वापरुन अगदी पटकन उकडलेल्या बटाट्याची सालं सोलू शकतो.


Web Title: The Easiest Way To Peel & Boil Potatoes How To Easily Peel Boiled Potatoes How To Boil & Peel Potatoes Quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.