Join us  

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : कांदा भजी हॉटेलसारखी कुरकुरीत होत नाही? एक सोपी ट्रिक, काही मिनिटात क्रिस्पी भजी रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 11:45 AM

The secret to light and crispy Onion Bhajis : ना पाणी, ना बेकिंग सोडा, ना इनो, कमी साहित्यात करून पाहा, हॉटेलस्टाईल कुरकुरीत कांदा भजी

पावसाळा असो किंवा हिवाळा प्रत्येक ऋतूत आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा भजी. भजी खायला काळवेळ लागत नाही. भजी अनेक प्रकारच्या केले जातात. कांदा, बटाटा, पालकाची भजी प्रत्येक जण आवडीने खातो. कुरकुरीत भजी करण्याची पद्धत अनेकांची वेगळी आहे. पण घरात कांदा भजी केल्यास ती हॉटेलसारखी कुरकुरीत होत नाही, मऊ होते.

कोजागरी पौर्णिमेला अनेक जण मसाला दुधासोबत भजी, सामोसा खातात. यंदाच्या कोजागरी पौर्णिमेला आपण मसाला दुधासोबत कांदा भजीचा बेत आखू शकता. जर आपल्याला हॉटेलमध्ये मिळते तशी कुरकुरीत कांदा भजी खायची असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. पाणी, बेकिंग सोडा, इनोचा वापर न करता कुरकुरीत कांदा भजी कशी करायची पाहा(The secret to light and crispy Onion Bhajis).

हॉटेलमध्ये मिळते तशी कुरकुरीत कांदा भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

कांदा

मीठ

लाल तिखट

हळद

ओवा

लिंबाचा रस

कोथिंबीर

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : करा एक कप तांदळाची खीर! जागरणासाठी मस्त सोपा सुटसुटीत आणि स्वादिष्ट बेत

तांदुळाचं पीठ

बेसन

तेल

कृती

सर्वप्रथम, ३ कांद्याची सालं काढून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कांदा धुतल्यानंतर धारदार चाकूने, कांदा उभा पातळ चिरून घ्या. त्यानंतर कांद्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्या. चिरलेला कांदा एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करा. त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा.

मळलेली कणिक लवकर काळपट-कडक होते? ३ सोप्या टिप्स, कणकेचा गोळा राहील अधिक काळ फ्रेश

१० मिनिटानंतर त्यात एक चमचा लाल तिखट, चिमुटभर हळद, अर्धा चमचा ओवा, एक चमचा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ चमचे तांदुळाचं पीठ व अर्धी वाटी बेसन घालून हाताने सर्व साहित्य एकजीव करा. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात भजी सोडून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे कोजागरी स्पेशल कांदा भाजी खाण्यासाठी रेडी.  

टॅग्स :कोजागिरीअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स