Lokmat Sakhi >Food > कुरकुरीत तरी कांदा भजी मऊ पडतात? सोप्या ५ टिप्स, भजी राहतील कुरकुरीत...

कुरकुरीत तरी कांदा भजी मऊ पडतात? सोप्या ५ टिप्स, भजी राहतील कुरकुरीत...

Super CRISPY Onion Bhaji Recipe : The secret to light & crispy Onion Bhajis : कितीही प्रयत्न करुन कांदा भजी तयार केली तरी ती खाताना मऊ पडते, असे न होता भजी कुरकुरीत व्हावी म्हणून टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2024 09:00 AM2024-08-18T09:00:00+5:302024-08-18T09:00:02+5:30

Super CRISPY Onion Bhaji Recipe : The secret to light & crispy Onion Bhajis : कितीही प्रयत्न करुन कांदा भजी तयार केली तरी ती खाताना मऊ पडते, असे न होता भजी कुरकुरीत व्हावी म्हणून टिप्स...

The secret to light & crispy Onion Bhajis Make PERFECT Onion Bhaji Every Time | कुरकुरीत तरी कांदा भजी मऊ पडतात? सोप्या ५ टिप्स, भजी राहतील कुरकुरीत...

कुरकुरीत तरी कांदा भजी मऊ पडतात? सोप्या ५ टिप्स, भजी राहतील कुरकुरीत...

पावसाळा आणि कांदा भजी हे समीकरण फार पूर्वीपासूनचं आहे. कुरकुरीत कांदा भजी कोणाला नाही आवडत. पण घरात कांदा भजी करताना त्याचा कुरकुरीतपणा कुठेतरी हरवून जातो. कांदा भजी तेल फार पितात. बऱ्याचदा कांदा भजी फार मऊ होतात. अशावेळी इच्छा असूनही भजी खावीशी वाटत नाही. जर घरात केलेली कांदा भजी कुरकुरीत होत नसेल तर, नेहमी ठेल्यावर जाऊन कांदा भजी विकत आणू नका. घरातच कांदा भजी करताना काही टिप्स लक्षात ठेवा. या काही टिप्समुळे कांदा भजी कुरकुरीत आणि परफेक्ट होतील. शिवाय चवीलाही टेस्टी लागतील(The secret to light & crispy Onion Bhajis).

कांदा भजी मऊ न पडता  कुरकुरीत होण्यासाठी टिप्स... 
 
१. सर्वातआधी कांदा उभा चिरून घ्या. एका बाऊलमध्ये उभा चिरलेला कांदा घ्या. त्यात एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करा. 

२. नंतर त्यात ओवा, चिमुटभर हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि २ चमचे तांदुळाचं पीठ घालून हाताने मिक्स करा.

फिल्टर नाही घरी, डोन्ट वरी! फिल्टर न वापरता ५ मिनिटांत करा फेसाळती फिल्टर कॉफी... 


रक्षाबंधन स्पेशल : नारळाच्या वड्या करताना ‘या’ ४ चुका टाळा, वड्या होतील फरफेक्ट पांढऱ्याशुभ्र... 

३. सर्वात शेवटी एक मोठा चमचा बेसन घाला. जेणेकरून कांद्यातील ओलावा तांदुळाचं पीठ आणि बेसन शोषून घेईल. 

४. कांदा भजी करताना पाणी अजिबात घालू नका. पाणी घातल्याने भजीतील कुरकुरीतपणा निघून जाईल. 

५. दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेलात भजी सोडून दोन्ही बाजूने तळून घ्या. तेल गरम झाल्यानंतरच भजी सोडून तळून घ्या. अशाप्रकारे भजी खाण्यासाठी रेडी.

Web Title: The secret to light & crispy Onion Bhajis Make PERFECT Onion Bhaji Every Time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.