उन्हाळ्यात रोज दही खावे. शिवाय अनेक पाककृतींमध्ये दह्याचा समावेश होतो (Dahi making). कोशिंबीर, कढी, दही भात, दही पोहे, शिवाय अनेक ग्रेव्हीमध्ये दह्याचा समावेश होतो. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात आरोग्यदायी प्रोबायोटिक असतात. शिवाय त्यातील गुड बॅक्टेरिया आरोग्याला अनेक पौष्टीक घटक प्रदान करतात (Kitchen Tips). दही एक कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे हाडांना बळकटी मिळते.
कॅल्शियम व्यतिरिक्त त्यात व्हिटॅमिन बी२, व्हिटॅमिन बी१२, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. काही जण विकतचे दही खातात, तर काही जण घरात दही तयार करून खातात. पण घरात लावलेलं दही आंबट होतं. ज्यामुळे खाण्याची इच्छा होत नाही. दही आंबट होऊ नये म्हणून एक ट्रिक फॉलो करा. दही परफेक्ट लागेल(The Secrets to Making the Perfect Homemade Dahi).
दही आंबट होऊ नये म्हणून..
- दही लावण्यासाठी प्रथम, एका भांड्यात दूध काढून गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, व दूध थंड करण्यासाठी हवेखाली ठेवा.
- आता एक रुंद भांडे घ्या. त्या भांड्यात दोन चमचे दही घाला. दही भांड्यामध्ये पसरवा.
डाळ-तांदूळ भिजवायची गरजच नाही, करा १० मिनिटांत सुपरसॉफ्ट इडली; उन्हाळ्यात खा हलकेफुलके
- दही भांड्यात पसरवल्यानंतर त्यात कोमट झालेलं दूध ओता. आणि त्यावर प्लेट झाका.
- दूधाचं भांडं एका उबदार ठिकाणी ठेवा. ५ ते ६ तासानंतर दही सेट झाले की, फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे दही आंबट होणार नाही आणि पूर्णपणे गोड राहील.
- या गोष्टी फॉलो केल्याने दही आंबट होणार नाही.
दह्यातील आंबटपणा कसा काढायचा?
- दह्यातील आंबटपणा कमी करण्यासाठी आपल्याला दुधाची गरज भासेल.
अरे हे काय? वर्गातच स्विमिंग पूल? उन्हाचा त्रास मुलांना होऊ नये म्हणून; शिक्षकांनी लढवली शक्कल..
- यासाठी एका काचेच्या बाऊलमध्ये आंबट दही घ्या आणि त्यात दह्याच्या दीडपट कोमट दूध घाला.
- हे मिश्रण रात्रभर तसच ठेवा. शिवाय दूध कोमटच असायला हवे. दुसऱ्या दिवशी दह्यातील आंबटपणा कमी होईल.