गुलाबी थंडी सरली आता लवकरच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होईल. गरम पेय कमी करून बरेच लोकं थंड पेय पिण्यासाठी स्टॉलबाहेर रांगा लावतील. सध्या विचित्र वातावरण सुरु आहे. कधी गरमी तर कधी थंडी वाजते. त्यामुळे लोकं कन्फ्युज झाले आहेत. तरी देखील लोकं चहा पिणं सोडत नाही. सध्या आरोग्याच्या दृष्टीने लोकं जागरूक झाले आहेत. साखरेऐवजी लोकं गुळाचे सेवन करत आहेत (Cooking Tips).
गुळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण बऱ्याच जणांना गुळाचा चहा बनवता येत नाही. गुळाचा चहा बनवताना बऱ्याचदा नासतो, ज्यामुळे गुळ, दूध आणि पाण्याची नासाडी होते (Jaggery Tea). गुळाचा चहा तयार करताना नासू नये, यासह व्यवस्थित तयार करण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करावेत. पाहूयात(The Sweet Benefits of Jaggery Tea, Ingredients and Receipe).
गुळाचा चहा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
पाणी
चहापत्ती
दूध
वेलची पूड
गुळ
आलं
कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात ठेचलेला आलं घाला. नंतर वेलची पूड घालून मिक्स करा.
३० सेकंदासाठी उकळी आल्यानंतर त्यात चहापत्ती घाला. पण चहापत्ती घालताना कमी प्रमाणात घाला. दुसरीकडे दूध गरम करण्यासाठी ठेवा. गुळाच्या चहामध्ये नियमित उकळी फुटलेल्या दुधाचाच वापर करावा.
आता गुळ किसून घ्या. किसलेला गुळ चहामध्ये घालून मिक्स करा, आणि गॅस मध्यम आचेवर ठेवा. गुळ चहाच्या पाण्यात विरघळल्यानंतर त्यात एक कप उकळलेलं दूध घाला.
दूध घातल्यानंतर ३० सेकंदासाठी चहा गरम करा, उकळी येऊ देऊ नका. उकळी फुटल्यानंतर चहा नासू शकते. ३० सेकंदानंतर गॅस बंद करा, व गाळणीने गाळून चहा एका कपमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे गुळाचा फक्कड चहा रेडी.