Lokmat Sakhi >Food > चहा पिण्यापेक्षीही घातक आहे तो पिण्याची चुकीची वेळ, ९० टक्के लोक करतात 'ही' चूक!

चहा पिण्यापेक्षीही घातक आहे तो पिण्याची चुकीची वेळ, ९० टक्के लोक करतात 'ही' चूक!

Tea drinking Tips : एकवेळ दिवसभरात तुम्ही १० कप चहा पिऊ शकता. पण चुकीच्या वेळी प्यायलेला चहा फार नुकसानकारक ठरतो. धक्कादायक बाब म्हणजे ९० टक्के लोक हीच चूक करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:47 IST2024-12-16T16:38:10+5:302024-12-16T16:47:22+5:30

Tea drinking Tips : एकवेळ दिवसभरात तुम्ही १० कप चहा पिऊ शकता. पण चुकीच्या वेळी प्यायलेला चहा फार नुकसानकारक ठरतो. धक्कादायक बाब म्हणजे ९० टक्के लोक हीच चूक करतात.

The timing of tea consumption is even more dangerous than drinking it, 90 percent of people make this mistake! | चहा पिण्यापेक्षीही घातक आहे तो पिण्याची चुकीची वेळ, ९० टक्के लोक करतात 'ही' चूक!

चहा पिण्यापेक्षीही घातक आहे तो पिण्याची चुकीची वेळ, ९० टक्के लोक करतात 'ही' चूक!

Tea drinking Tips : चहा आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे हे एक्सपर्ट नेहमीच सांगत असतात. दुधाचा चहा तर आरोग्यासाठी खूप जास्त नुकसानकारक मानला जातो. पण एक चूक १० कप चहा पिण्यापेक्षाही जास्त घातक मानली जाते. फॅमिली फिजिशिअन डॉ. कुलबीर जाखड यांनी सांगितलं की, एकवेळ दिवसभरात तुम्ही १० कप चहा पिऊ शकता. पण चुकीच्या वेळी प्यायलेला चहा फार नुकसानकारक ठरतो. धक्कादायक बाब म्हणजे ९० टक्के लोक हीच चूक करतात.

डॉक्टरांचा मत आहे की, चहा प्यायल्याने पोट आणि डायजेशनचं नुकसान होतं. याने अॅसिडिटी वाढते. पण चुकीच्या वेळेवर चहा पिणं त्यापेक्षी घातक आहे. अशात डॉक्टरांनी चहा पिण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. 

डॉक्टर म्हणाले की, चहा फार घातक पेय आहे. खासकरून उपाशापोटी चहा पिणं जासत घातक ठरतं. जर तुम्ही दिवसातून ५ कप चहा पित असाल तर सगळ्यात आधी नाश्त्याच्या आधी घेतला जाणारा चहा सोडा. हा फार अनहेल्दी आहे.


 

अनेक लोक साखरेऐवजी आर्टिफिशिअल स्वीटनरचा वापर करतात. अनेकदा डायबिटीस किंवा वेट लॉस डाएटवर असलेले लोक असं करतात. डॉक्टरांनी स्वीटनर न वापरण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, स्वीटनरऐवजी थोडी साखर वापरा.
चहा हेल्दी बनवण्याची पद्धत

डॉक्टर म्हणाले की, चहा पिणं नुकसानकारक आहे. पण तरीही २ गोष्टी न टाकता चहा थोडा चांगला बनवता येऊ शकतो. यासाठी चहामध्ये साखर टाकू नका. जर चहा हेल्दी बनवायचा अशल तर दुधही टाकू नका. फीका काळा चहा पिणं जास्त हेल्दी असतं.

डॉक्टरांनी चहाऐवजी २ ड्रिंक पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यानुसार ग्रीन टी प्यायल्याने जास्त फायदा मिळतो. त्याशिवाय दूध नसलेली कॉफीही हेल्दी ड्रिंक आहे.
 

Web Title: The timing of tea consumption is even more dangerous than drinking it, 90 percent of people make this mistake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.