Join us  

माधुरी दीक्षित सांगतेय, पावसाळ्यात ऑइल फ्री भजी खाण्याची गंमत, न तळता भजी करण्याची रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2023 4:19 PM

The Ultimate Monsoon Snack Combo | Onion Bhaji in 4 Ways भजी पावसाळ्यात खायची मजाच और पण तेलकट नको असेल तर पाहा ही ट्रिक

बॉलीवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित ही आपल्या अदाकारी आणि फिटनेससाठी ओळखली जाते. ती आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडीयावर फार सक्रीय असते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या ऋतूत मुख्य म्हणजे खवय्यांची चंगळ सुरु असते. पण जे डाएट फॉलो करतात त्याचं काय?

भजी खायला प्रत्येकाला आवडतात. भजी अनेक प्रकारच्या केले जातात. पण भजी तेलकट असल्यामुळे काही लोकं खाणे टाळतात. पण आपण माधुरीची ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता. तिने रेसिपी व्हिडिओमध्ये डीप फ्राई, शॅलो फ्राई, एअर फ्राइड आणि बेक पद्धतीने कांदे भजी कशी तयार करायची याची माहिती दिली आहे(The Ultimate Monsoon Snack Combo | Onion Bhaji in 4 Ways).

डाएट स्पेशल कांदे भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

२ मध्यम आकाराचे कांदे

2/3 कप बेसन

२ चमचे तांदळाचे पीठ

१/२ टीस्पून किसलेले आले

बारीक चिरलेली हिरवी मिरची 

1/2 टीस्पून हळद

1/2 टीस्पून लाल तिखट

१ कप मूगडाळीचे करा चविष्ट आप्पे, सोडा न घालताही आप्पे फुगतील टम्म

एक चिमूटभर बेकिंग सोडा

1 टीस्पून तेल

2 ते 3 चमचे पाणी

कृती

- एका भांड्यात चिरलेला कांदा, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, आले आणि हिरवी मिरची घालून पीठ तयार करा.

- बॅटर तयार झाल्यानंतर त्यात बेकिंग सोडा आणि थोडे तेल घाला, नंतर चांगले मिक्स करा.

- आवश्यक असल्यास आपण त्यात पाणी मिक्स करू शकता.

- बॅटर तयार झाल्यानंतर भजी बेक करा, डीप फ्राय करा, एअर फ्राय करा, किंवा शॅलो फ्राय करूनही आपण खाऊ शकता.

१ वाटी बेसन - १ कप पाणी, यंदाच्या पावसात खाऊनच पाहा चमचमीत ‘झुणका वडी!’

तळलेले पदार्थ खाल्ल्याने हे आजार होऊ शकतात

तळलेले पदार्थ खायला चविष्ट वाटत असले तरी, ते खाण्याचे तोटेही जास्त आहेत. अशा अन्नामध्ये कॅलरी, कोलेस्टेरॉल आणि चरबी जास्त असते. तेलात तळलेले भजी खाल्ल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी विविध आरोग्य समस्या होण्याची शक्यता वाढते.

टॅग्स :माधुरी दिक्षितअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्समोसमी पाऊस