बहुतांश भारतीय पदार्थांमध्ये तेलाचा वापर होतो. तेलाशिवाय भारतीय पदार्थ अपूर्ण आहे. फोडणी असो किंवा तळणी, तेल हे वापरण्यात येतेच. तेलात देखील अनेक प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार तेलाचा वापर करतो. फिटनेस फ्रिक लोक आपल्या आहारात तेलाचा वापर कमी प्रमाणात करतात.
पदार्थात जास्त तेलाचा वापर केल्यास बॅड कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, मधुमेह, हृदयाच्या निगडीत समस्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सणावाराच्या दिवसात आपण तळलेले पदार्थ खातोच. पुरी, भजी, पापड करतोच. परंतु, उरलेल्या तेलाचं करायचं काय असा प्रश्न पडतो. उरलेल्या तेलाचा वापर ४ गोष्टींसाठी होऊ शकते(The Use and Reuse of Cooking Oil - FSSAI).
एफएसएसएआयने(FSSAI- Food Safety and Standards Authority of India) शेअर केलेल्या माहितीनुसार
'कोणतेही तेल तळण्यासाठी एकदाच वापरावे. उच्च स्मोकिंग पॉईंटवर वापरले जाणारे हे तेल, पुन्हा वापरणे रिस्की ठरू शकते. तळण्यासाठी तेल पुन्हा वापरण्यासाठी ते चांगले फिल्टर करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन सर्व जळलेले अन्नाचे कण निघून जातील. तळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचा वापर फक्त भाजी, करी किंवा चपाती करण्यासाठी करावा.'
ना उकड ना तळण, ओल्या नारळाचे करा झटपट मोदक, कमी वेळ आणि कमी साहित्यात मस्त मोदक
चपाती किंवा पराठे करण्यासाठी करा वापर करा
उरलेल्या तेलाचा वापर आपण पराठे किंवा चपाती करण्यासाठी करू शकता. पराठे किंवा चपातीचं पीठ मळताना आपण उरलेल्या तेलाचा वापर करू शकता. यामुळे पराठे खमंग, खुसखुशीत होतील. मात्र, फिल्टर न करता उरलेल्या तेलाचा वापर करू नये.
खिडक्या आणि दारासाठी करा वापर
पावसाळ्यात खिडक्या आणि दारामधून आवाज येतो. अनेकदा दाराचे लाकूड फुगते. किंवा लोखंडी खिडक्या गंजतात. अशा वेळी आपण उरलेल्या खाद्य तेलाचा वापर करू शकता. उरलेले तेल दरवाजे आणि खिडक्यांच्या हुकवर लावू शकता. यामुळे खिडक्या आणि दारामधून आवाज येणार नाही. व लोखंडी खिडक्या गंजणारही नाही.
बागकामासाठी ठरेल उपयुक्त
आपण उरलेल्या तेलाचा वापर बागकामासाठी करू शकता. यासाठी हे तेल एका वाटीमध्ये ठेवा, व ही वाटी रोपाच्या जवळ ठेवा. यामुळे रोपाच्या जवळ कोणतेही कीटक फिरकणार नाही. ज्यामुळे रोपटे कीटकांपासून सुरक्षित राहतील.
कुकरमध्ये कोण तूप कढवते, ते ही शिट्टी लावून? पाहा भन्नाट ट्रिक, करा रवाळ झटपट तूप
लोणचे तयार करण्यासाठी करा वापर
उरलेल्या तेलाचा वापर आपण लोणचं तयार करण्यासाठी करू शकता. यासाठी तेल फिल्टर करून घ्या. त्यानंतर या तेलाचा वापर लोणचं तयार करण्यासाठी करा. जर तेल एकदाच वापरण्यात आले असेल तरच याचा वापर करावा. अन्यथा उरलेल्या तेलाचा वापर टाळणे उत्तम ठरू शकते.