वेगवेगळ्या चटण्या, कोशिंबीरी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आंबट- गोड चवीची चटकदार लोणची जेवणात तोंडी लावायला असतील, तर जेवणाची मजा आणखी वाढत जाते. साधंच जेवण असलं तरी जेवणात रंगत येते आणि दोन घास जास्तीचे खाल्ले जातात. आता लिंबाचं लोणचं तर आपण नेहमीच करतो (lemon pickle). लिंबाचं गोड लोणचं, तिखट लोणचं आपण आतापर्यंत बऱ्याचदा खाल्लं आहे. आता यावेळी लिंबाचा आंबट- गोड- तिखट असा संमिश्र चवीचा क्रश किंवा सॉस करून पाहा (How To Make Lemon Sauce). जेवणात तोंडी लावायला हा सॉस असेल तर जेवणाची मजा निश्चितच वाढेल.
लिंबाचा सॉस करण्याची रेसिपीलिंबाचा सॉस किंवा क्रश कसा करायचा, याची रेसिपी iambhagyashrii या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
९ पातळ सालीची लिंब
तुम्ही घेतलेला लसूण हायब्रीड आहे की गावरान? लसणाची खरेदी करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी
२० ग्रॅम आलं
१.५ टेबलस्पून सैन्धव
१ टेबलस्पून साधं मीठ
१.५ टेबलस्पून तिखट
तयार झालेल्या क्रशच्या दुप्पट गूळ आणि साखर
कृती
सगळ्यात आधी तर लिंबं चिरून घ्या आणि त्यांच्या बिया काढून टाका.
यानंतर लिंबाच्या फोडी मिक्सरमधून काढून त्याची बारीक पेस्ट करून घ्या
डोळ्यांखालची काळी वर्तूळं घालविण्याची सोपी ट्रिक, फक्त ३ पदार्थ वापरून करा सोपा उपाय
आता या लिंबाच्या गरामध्ये तिखट, मीठ, सैंधव मीठ, बारीक किसून घेतलेलं आलं टाका.
यानंतर सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या आणि एक ते दिड तास ते तसंच झाकून ठेवा. यामुळे सगळ्या पदार्थांचे स्वाद छान एकत्र होतील.
एक ते दिड तासानंतर हे सगळं मिश्रण कढईमध्ये टाकून छान शिजवून घ्या. थंड झाल्यावर हा सॉस किंवा लिंबाचा गर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.
पुढे कित्येक महिने लिंबाचा सॉस छान टिकेल.