Join us  

फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ब्रेड कडक - चवही बिघडली? शेफ म्हणतात १ ट्रिक वापरुन पाहा; मिनिटात ब्रेड फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2024 1:46 PM

The Very Best Ways to Store Fresh Bread : ब्रेड स्टोअर करताना १ गोष्ट लक्षात ठेवा

झटपट नाश्ता करण्यासाठी आपण ब्रेडचा वापर करतो (Kitchen Tips). ब्रेड - बटर, ब्रेड - जाम, सॅण्डविच, याव्यतिरिक्त ब्रेडचे विविध पदार्थ तयार करून खातो. बहुतांश लोकांच्या घरात ब्रेडचा एक मोठा किंवा छोटा पॅकेट असतोच (Cooking Tips). ब्रेडचे २-३ स्लाईज वापरल्यानंतर आपण उरलेला पॅकेट फ्रीजमध्ये ठेवतो (Bread). फ्रीजमध्ये ठेवलेला ब्रेड पुन्हा कडक होतो.

ब्रेड कडक झाल्यानंतर त्याचा वापर आपण सहसा करत नाही. कडक ब्रेड कोणी खातही नाही. पण ब्रेड फेकून देण्याची इच्छा होत नाही. जर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ब्रेड कडक झाला असेल तर, शेफ पंकज भदौरिया यांनी शेअर केलेली एक ट्रिक फॉलो करून पाहा. त्यांनी ही ट्रिक सोशल मिडियावर व्हिडिओद्वारे शेअर केली आहे.या ट्रिकमुळे ब्रेड पुन्हा फ्रेश होईल(The Very Best Ways to Store Fresh Bread).

कडक ब्रेड फ्रेश आणि मऊ करण्यासाठी एक ट्रिक

- सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात ब्रेड पसरवून ठेवा. त्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडा आणि झाकण लावा.

कुणाला जिलेबी तर कुणाला लागले ढोकळा खाण्याचे डोहाळे! बॉलीवूड अभिनेत्री सांगतात, गरोदरपणात काय खावेसे वाटले..

- पॅन झाकून ठेवल्यानंतर ३० सेकंदांनी गॅस बंद करा. जेव्हा आपण झाकण काढाल तेव्हा, आपल्याला कडक ब्रेड फ्रेश झालेला दिसेल.

- जर ब्रेडची एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर, ब्रेड खाणं टाळा. शक्यतो एक्सपायरी निघून गेलेली ब्रेड फेकून द्यावे.

बाजारात मिळते तसे मटकीला मोड येत नाहीत? १ सोपी ट्रिक; मटकीला कुबट वासही येणार नाही

- ब्रेड ताजे आणि मऊ ठेवण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करा. ॲल्युमिनियम फॉइलमध्ये ब्रेड गुंडाळून ठेवा. यामुळे ब्रेडला हवा लागणार नाही. शिवाय ब्रेड अधिक काळ फ्रेश राहील.

- ब्रेड स्टोअर करताना कागदी पिशवीचा वापर करा. यामुळे ब्रेड लवकर कडक होणार नाही. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स