Lokmat Sakhi >Food > हे ४ पदार्थ तुम्ही फ्रिजमध्ये ठेवले असतील तर आत्ताच्या आत्ता बाहेर काढा! वाचा, काय बिघडते..

हे ४ पदार्थ तुम्ही फ्रिजमध्ये ठेवले असतील तर आत्ताच्या आत्ता बाहेर काढा! वाचा, काय बिघडते..

these 4 food items are not meant to kept in fridge : हे चार पदार्थ तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवले आहेत, तर नक्कीच नुकसान होईल. जाणून घ्या कसे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 20:09 IST2025-03-02T20:08:31+5:302025-03-02T20:09:59+5:30

these 4 food items are not meant to kept in fridge : हे चार पदार्थ तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवले आहेत, तर नक्कीच नुकसान होईल. जाणून घ्या कसे.

these 4 food items are not meant to kept in fridge | हे ४ पदार्थ तुम्ही फ्रिजमध्ये ठेवले असतील तर आत्ताच्या आत्ता बाहेर काढा! वाचा, काय बिघडते..

हे ४ पदार्थ तुम्ही फ्रिजमध्ये ठेवले असतील तर आत्ताच्या आत्ता बाहेर काढा! वाचा, काय बिघडते..

आपण स्वयंपाक घर साफ ठेवण्याकडे भरपूर लक्ष देतो. समोर जास्त वस्तू दिसू नयेत, नाही तर उगाच पसारा आहे असं वाटतं. (these 4 food items are not meant to kept in fridge  )या कारणाने आपण सगळ्या वस्तू मग ताट असतील, वाट्या असतील किंवा अन्न पदार्थ असतील, ते समोर दिसणार नाहीत याची काळजी घेतो. ट्रॉलीमध्ये ठेवतो. (these 4 food items are not meant to kept in fridge  )कपाटांमध्ये ठेवतो. अनेक रोजच्या वापराचे पदार्थ आपण फ्रिजमध्येही कोंबून टाकतो. 

आपण इतरांनाही हे काही पदार्थ फ्रिजमध्येच ठेवताना पाहतो. त्यामुळे ते योग्यच आहे, असे आपल्याला वाटते. पण तुम्हाला माहिती आहे का? असे काही पदार्थ आहेत जे फ्रिजमध्ये ठेऊ नयेत तरी आपण ठेवतो? आत्ताही हे पदार्थ तुमच्या फ्रिजमध्येच असतील. फिट ट्यूबर या चॅनलने अशा पदार्थांची यादी सांगितली आहे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत, जे फ्रिज मधून काढायची गरज आहे.

१. खडे मसाले
आपण सगळे खडे मसाले फ्रिजमध्येच ठेवतो. खड्या मसाल्यांसाठी एकच गोष्ट वाईट असते ती म्हणजे आर्द्रता. आणि तरीही आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. हे मसाले बाहेर राहिले म्हणून अजिबात खराब होत नाहीत. आपण सवयीमुळे ते फ्रिजमध्ये ठेवतो. खडे मसाले हवाबंद डब्यामध्ये काढून, कपाटामध्ये ठेवून द्या.

२. लोणचे
आपण आंब्याचे लोणचे असो वा लिंबाचे ते ही फ्रिजमध्ये ठेवतो. खरं तर फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्याची चव बदलून जाते. तसेच त्याचे टेक्श्चरही बदलतं. त्यामुळे लोणचं साध्या कपाटात ठेवा. मग बघा त्याची चव जास्त चांगली लागते की नाही. फ्रिजमुळे लोणच्याचा खार  गोठून जातो.

३. सुकामेवा
सुकामेवा आपण कायमच फ्रिजमध्ये ठेवतो. प्लॉस्टिकच्या पिशवीमध्ये सुकामेवा ठेवू नका. तो चांगल्या हवाबंद डब्यामध्येच ठेवा. आणि तो सुकामेव्याचा डबा कपाटात किंवा इतर ठिकाणी ठेवा. सुकामेवा खराब होत नाही. पण फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची चव बदलते. त्याचा कुरकूरीत पणा कमी होतो.

४. तेल व तूप
 आपण घरात विविध प्रकारची तेल वापरतो. खोबरेल तेल, शेंगदाण्याचं तेल इतर तेल काही जण फ्रिजमध्ये ठेवतात. तसेच तूपही फ्रिजमध्ये ठेवतात. त्याची काहीच आवश्यकता नाही. तेल बंद जागेत ठेवावे. तेवढेच पुरेसे असते. काचेच्या बाटल्यांमध्ये तेल ठेवणे चांगले असते. तूप जर व्यवस्थित चांगल्या भांड्यात साठवले तर, ते औषधांसारखेच काम करते.      

Web Title: these 4 food items are not meant to kept in fridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.