Lokmat Sakhi >Food > ब्रेकफास्टसाठी झटकेपट बनवा हे 4 पौष्टिक पदार्थ, सकाळच्या घाईत परिपूर्ण नाश्ता

ब्रेकफास्टसाठी झटकेपट बनवा हे 4 पौष्टिक पदार्थ, सकाळच्या घाईत परिपूर्ण नाश्ता

सकाळच्या नाश्ता पौष्टिक असणं ही आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची बाब आहे. कमी वेळात पौष्टिक नाश्त्याचं सूत्र जमवून आणणारे हे काही सोपे पर्याय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:55 PM2021-06-19T16:55:30+5:302021-06-19T17:06:57+5:30

सकाळच्या नाश्ता पौष्टिक असणं ही आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची बाब आहे. कमी वेळात पौष्टिक नाश्त्याचं सूत्र जमवून आणणारे हे काही सोपे पर्याय.

These 4 nutritious snacks for breakfast, the perfect breakfast in a hurry | ब्रेकफास्टसाठी झटकेपट बनवा हे 4 पौष्टिक पदार्थ, सकाळच्या घाईत परिपूर्ण नाश्ता

ब्रेकफास्टसाठी झटकेपट बनवा हे 4 पौष्टिक पदार्थ, सकाळच्या घाईत परिपूर्ण नाश्ता

Highlightsवजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात ब्राउन ब्रेडचे पदार्थ चांगला पर्याय आहे. नाश्त्याला दही पराठी खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून रहाते. मक्याची टिक्की आणि रव्याचा उत्तपा हे कमी तेलात आणि कमी वेळात होणारे पौष्टिक पदार्थ आहेत.


 दिवसभरातल्या खाण्यापिण्यात सकाळच्या नाश्त्याला अतिशय महत्त्व आहे. पण सकाळची वेळ म्हणजे अगदी घाईची. त्यामुळे नाश्त्याला काहीबाही बनवून वेळ साधली जाते किंवा नाश्ताच टाळला जातो. सकाळच्या नाश्ता पौष्टिक असणं ही आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची बाब आहे. कमी वेळात पौष्टिक नाश्त्याचं सूत्र सहज जमवून आणता येतं. त्यासाठी खाली दिलेल्या पाककृती करुन पाहा आणि सकाळी पौष्टिक नाश्ता केल्याचं समाधान अनुभवा.

 

ब्राउन ब्रेडच पौष्टिक सॅंण्डविच

वजन कमी करण्यासाठी ब्राउन ब्रेड ह उत्तम पर्याय आहे. कारण त्याद्वारे आपल्याला ओमेगा 3, फॅटी अँसिड, फोलेट आणि पोटॅशिअम असतं. ब्राउन ब्रेड सॅण्डविच बनवण्यासाठी 8 ब्राउन ब्रेड स्लाइस, 3 कांदे बारीक चिरलेले, 3 टमाटे बारीक कापलेले, 4 हिरव्या मिरच्या, 2 गावरान तूप , सॉस किंवा चटणी
सॅण्डविचर करताना दोन ब्राउन ब्रेड घ्यावेत. आणि चारी बाजूंना गावरान तूऋअ लावावं. मग बारीक चिरलेला कांदा, टमाटा , हिरवी मिरची, लाल मिरची आणि मीठ टाकावं. हा मसाला चांगला एकत्र करावा. आणि तो दोन ब्राउन ब्रेडच्या मधे भरावं. आणि ब्रेड तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावेत.

दह्याचा चटपटीत पराठा

नाश्त्याल दही पराठा खाल्ल्यास दिवसभर मूड चांगला राहातो. कामाची ऊर्जा मिळते. शिवाय दहयाच्या पराठ्यामुळे शरीरात ओलावाही टिकून राहातो त्यामुळे दिवसभराच्या कामातून थकवा येत नाही.
 दही पराठा बनवण्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ, एक कप दही, पाव चमच हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा ओवा, एक चमचा कसूरी मेथी, एक चमचा आल्याची पेस्ट, दोन चमचे कोथिंबिर, दोन चमचे पुदिना, अर्धा चमचा मीठा आणि दोन मोठे चमचे तेल घ्यावं.
पराठे बनवताना गव्हाच्या पिठात बारीक चिरलेली कोथिंबिर, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, हळद, मिरे पावडर घालावी. कणिक पाण्याऐवजी दह्याच्या सह्याय्यानं मळावी. कणिक मळून त्याला तेल लावून दहा मिनिटं झाकून ठेवावी. दहा मिनिटानंतर आपल्या नेहेमीच्या पराठ्यांसारखे पराठे करुन भाजावेत.

मक्याची टिक्की

मक्याची टिक्की तयार करण्यासाठी उकडलेले बटाटे, उकडलेला मका, ब्रेडचा चुरा, लाल तिखट, धने पावडर, हळद, गरम मसाला, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
मक्याची टिक्की तयार करताना उकडलेले बटाटे सोलून ते कुस्करुन घ्यावेत. त्यात उकडलेला मका टाकावा, ब्रेडचा चूरा आणि हिरवी मिरची मिक्सरमधे वाटून घ्यावी. मग लाल तिखट, आलं, चाट मसाला, कोथिंबिर, आणि मीठ बटाटा मक्याच्या मिश्रणात घालावं. या मिश्रणाचे गोल गोळे घेऊन ते जाडसर चपटे करावेत. पॅनवर तेल घेऊन मंद आचेवर ते दोन्ही बाजूंनी भाजावेत. यासाठी तेल अतिशय कमी लागतं. त्यामुळे मक्याच्या टिक्की खाण्यास पौष्टिक असतात.

 

रव्याचा उत्तप्पा

एका भांड्यात रवा आणि दही घ्यावं. त्यात थोडं मीठ घालावं. त्यात थोडं पाणी घालून डोशाच्या पिठाप्रमाणे पीठ तयार करावं. या पिठात कांदा, टमाटे, गाजर, सिमला मिरची, हिरवी मिरची, किसलेलं आलं, कोथिंबिर घालून हे मिश्रण चमच्यानं चांगलं ढव्ळून घ्यावं. एक पाच दहा मिनिटं मिश्रण झाकून ठेवावं. आणि मग पॅनवर थोडं तेल लावून जाडसर उत्तप्पे लावावेत. मंद आचेवर ते दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावेत. रव्याचा उत्तप्पा करताना तेल अतिशय कमी लागतं. आणि पोटभरीचा नाश्ता होतो. 

Web Title: These 4 nutritious snacks for breakfast, the perfect breakfast in a hurry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.