'स्वयंपाक करणं ही देखील एक कला आहे' असं म्हणतात. काही जण फारच चविष्ट स्वयंपाक करतात. स्वयंपाक करताना आपल्याला आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. आपण जे काही अन्न तयार करतो आणि खातो, त्यात पोषक तत्व असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे चवीसोबतच आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
स्वयंपाकघरात जेवण करताना अनेकदा लोक नकळत खूप चुका करतात. अशा परिस्थितीत आपण तयार करत असलेल्या अन्नातील पोषक घटक नष्ट होतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. जर तुम्हाला हे पोषक तत्व कमी होण्यापासून वाचवायचे असतील तर काही सोप्या टीप्स आहेत.
कढईमध्ये भाजी बनवणं
बरेच लोक बहुतेक भाज्या कढईमध्ये शिजवतात. असं केल्याने सर्व पोषक तत्व वाफेद्वारे नष्ट होतात. अशा वेळी तुम्ही बहुतेक भाज्या कढईऐवजी कुकरमध्ये शिजवाव्यात. असं केल्याने तुमचा वेळ आणि गॅस वाचेलच पण पोषक तत्वही टिकून राहतील.
भाज्या उकडवणे
काही लोक अनेक भाज्या आणि इतर पदार्थ उकडवात, जे खरं तर उकडवण्याची आवश्यकता नसते आणि नंतर ते पुन्हा शिजवतात. ही चुकीची पद्धत आहे. असं केल्याने, त्या अन्नातील सर्व पोषक घटक पाण्यासोबतच निघून जातात.
जास्त वेळ पदार्थ शिजवणे
काही लोक घाईघाईत स्वयंपाक करताना गॅसचा फ्लेम वाढवतात. असं केल्याने तुमचे पदार्थ करपून जातात. तसेच खूप वेळ शिजवल्याने त्यातील पोषक घटक देखील नष्ट होऊ लागतात.
तेलाचा पुन्हा वापर
काही लोक भाजी शिजवण्यासाठी पुरी किंवा भजी बनवल्यानंतर उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून असं करणं चुकीचं आहे. यामुळे अन्नातील पोषक तत्वं नष्ट होतात. यासोबतच तेलाचा वारंवार वापर केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
भाज्या कापून झाल्यावर धुणे
बाजारातून भाजी आणल्यानंतर ती नीट साफ केली पाहिजे, धुवून स्वच्छ करा. काही लोक भाजी आधी कापतात मग धुतात, त्यामुळे त्यातील पोषक घटक निघून जातात. ज्या भाज्यांची साल काढणं गरजेची आहे. त्याचीच साल काढा. काही भाज्यांच्या सालींमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतात.