किचनमधील सर्वात कंटाळवाणे काम कुठले असेल तर ते भाजी निवडणे व चिरणे. स्वयंपाक बनविण्यासाठी आपण लागणाऱ्या भाज्या आधी बारीक चिरून घेतो. दररोज लागणाऱ्या भाज्या बनवताना त्या कापण्यात किंवा चिरण्यात आपला बराच वेळ खर्ची होतो. काहीवेळा आपण दुसऱ्या दिवशी करायच्या भाज्या आदल्या रात्रीच चिरुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवतो. जेणेकरुन दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना आपला वेळ वाया जाणार नाही.
सध्या सगळीकडेच सणासुदीचे वातावरण पाहायला मिळते आहे. कोणताही सण म्हटलं की घरात वेगवेगळे पंचपक्वान्न करणं आलंच. सणावाराला जेवणावळ, नैवेद्य, जेवणाच्या पंगती आल्याचं. या सगळ्या स्वयंपाकाची तयारी करताना घरच्या गृहिणीची फारच धावपळ होते.(These Cool Hacks For Chopping Vegetables Fast Help You Spend Less Time In The Kitchen) अशावेळी आपण काही गोष्टींची तयारी ही आधीच करून ठेवतो. आपल्यापैकी बऱ्याच महिलांना भाज्या चिरणे (Amazing hacks for vegetable cutting) म्हणजे खूपच कंटाळवाणे काम वाटते. काही भाज्या चिरण्यात इतका वेळ जातो की, त्या वेळात संपूर्ण स्वयंपाक बनून तयार होईल. भाज्या चिरणे हे खूपच कंटाळवाणे काम कसे झटपट उरकता येईल यासाठी अनेक महिला बऱ्याच युक्त्या (Simple kitchen hacks that will make your life so much easier) शोधत असतात. आपण देखील या सणावाराच्या दिवशी झटपट स्वयंपाक बनवण्यासाठी भाज्या चिरण्याची एक सोपी ट्रिक वापरु शकतो(2 Vegetable Chopping Hacks That Can Make Your Life Easier.)
झटपट भाज्या चिरण्यासाठी लक्षात ठेवा काही सोप्या ट्रिक्स...
१. रबर बँडचा वापर करावा :- भेंडी, फरसबी यांसारख्या भाज्या कापण्यात आपला बराच वेळ जातो. भेंडी किंवा फरसबी अशा भाज्या एक एक घेऊन कापल्या तर त्यात आपला बराच वेळ जातो. तसेच एकावेळी ३ ते ४ भेंडी किंवा फरसबी हातात घेऊन कापण्याचा प्रयत्न केला तर त्यात हातातून सटकून जाण्याची भीती असते. भेंडी सारखी बुळबुळीत भाजी चिरताना हातातून निसटते, तसेच अशा भाज्या कापणे म्हणजे खूप वेळखाऊ काम असते. अशावेळी या भाजीला एकत्र करून त्याच्या वरच्या टोकाला रबर बँड लावून त्याचा एक गठ्ठा तयार करून घ्यावा. आता हळूहळू भाजी कापण्यास सुरुवात करावी. यामुळे एकाचवेळी आपली भरपूर भाजी चिरून होईल. याचबरोबर भाजी चिरण्याच्या या वेळखाऊ कामाला अतिशय कमी वेळ लागेल.
पोळ्यांच्या डब्यातील पहिली पोळी वाफेने ओली होते ? २ सोपे उपाय, पोळी होणार नाही शिडशिडी...
२. मऊ नॅपकिन किंवा टॉवेलचा वापर करावा :- भाज्या चिरताना आपण बहुतेकवेळा मोठ्या डिशचा किंवा चॉपिंग बोर्डचा वापर करतो. काहीवेळा भाज्या कापताना डिश किंवा चॉपिंग बोर्ड जागेवरुन सरकण्याची शक्यता असते. भाज्या कापताना डिश किंवा चॉपिंग बोर्ड अचानक सरकल्याने आपल्याला इजा होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, डिश किंवा चॉपिंग बोर्ड जागेवरुन सरकू नये किंवा जागचा हलू नये म्हणून त्या खाली मऊ टॉवेल किंवा छोटे नॅपकिन अंथरावे. असे केल्याने डिश किंवा चॉपिंग बोर्ड एका जागेवर जमिनीला चिकटून राहील. यामुळे डिश किंवा चॉपिंग बोर्ड एकाच जागेवर स्थिर राहून जागचे हलणार नाही. असे केल्याने भाजी चिरणे आपल्याला सोपे जाईल तसेच चटकन भाजी चिरुन होईल.