Lokmat Sakhi >Food > Thick curd recipe: 'या' पद्धतीने विरजण लावाल तर खरवसासारखी घट्ट दह्याची वडी मिळेल!

Thick curd recipe: 'या' पद्धतीने विरजण लावाल तर खरवसासारखी घट्ट दह्याची वडी मिळेल!

Thick Curd Recipe: उन्हाळ्यात दही लवकर सेट होते, पण ते पाणीदार न राहता कवडीदार कसे बनवायचे; यासाठी जाणून घ्या सोप्पी ट्रिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2025 12:34 IST2025-03-01T12:33:21+5:302025-03-01T12:34:26+5:30

Thick Curd Recipe: उन्हाळ्यात दही लवकर सेट होते, पण ते पाणीदार न राहता कवडीदार कसे बनवायचे; यासाठी जाणून घ्या सोप्पी ट्रिक!

Thik curd recipe: Set homemade curd by this method, you may amazed by the result! | Thick curd recipe: 'या' पद्धतीने विरजण लावाल तर खरवसासारखी घट्ट दह्याची वडी मिळेल!

Thick curd recipe: 'या' पद्धतीने विरजण लावाल तर खरवसासारखी घट्ट दह्याची वडी मिळेल!

आजी म्हणायची, 'ज्या घरात दही नाही तिथे काही नाही!' थोडक्यात दही हे आरोग्यासाठी उत्तम आहेच, पण अडीअडचणीला जेवणात पूरक म्हणूनही दह्याचा वापर करता येतो. दही पोहे, दही साखर पोळी, दही पराठा, दही भात, दही मिरची असे कितीतरी पदार्थ आणि काही नसेल तर दह्यात पाणी टाकून ताक कामी येतेच. म्हणून घरात रोजच्या रोज दही लावावे. 

पण बाजारात मिळते तसे कवडीदार अर्थात घट्ट दही घरी लागत नाही अशी अनेकांची तक्रार असते. त्यासाठी वातावरणाचा, दुधाचा, विरजणाच्या गुणवत्तेचाही भाग असतो. यावर एक छान उपाय, असा एक पदार्थ जो नेहमी आपल्या घरातच असतो आणि तो मिसळल्याने दही खरवसाच्या वडीसारखे घट्ट बनवतो. चला तर पाहूया रीत आणि त्याहून महत्त्वाची कृती! 

साहित्य : 

दूध, दह्याचे विरजण, एक चमचा दुधाची पावडर

कृती : 

>> सर्वप्रथम दूध कोमटसर तापवून घ्या. 
>> दूध तापवताना त्यात एक चमचा मिल्क पावडर घाला, त्यामुळे दुधाला दाटपणा येईल आणि दही घट्ट होण्यास मदत होईल. 
>> चमच्याने दूध ढवळून घ्या. 
>> दूध कोमट झाले की गॅसवरून उतरवून त्यात चमचाभर विरजण घाला. 
>> विरजण घातलेले दूध घुसळणीने ताकासारखे घुसळून घ्या. त्यामुळे तिन्ही जिन्नस एकजीव होतील. 
>> तयार दूध शक्यतो मातीच्या भांड्यात टाका. 
>> मातीचे भांडे नसेल तर नेहमीच्या दह्याच्या भांड्यात दूध घालून एखाद्या उबदार कोपऱ्यात ते झाकून ठेवा. 
>> शक्यतो रात्री झोपताना विरजण लावले तर रात्रभर त्यावर प्रक्रिया होते. दह्याला धक्का लागत नाही. 
>> दही सेट करायला ठेवल्यावर ते जितके स्थिर ठेवाल तेवढे ते लवकर लागते. 
>> मिल्क पावडरमुळे दह्याला घट्टपणा येऊन कवडीदार दही तयार होईल. 
>> अशा दह्याला पाणीहीही सुटत नाही. 
>> घट्ट दही खायला सगळ्यांना आवडते. त्यामुळे वेळीच विरजणासाठी चमचाभर दही बाजूला काढून ठेवा, अन्यथा ते संपून जाईल. 
>> चांगले दही लागण्यासाठी चांगले विरजण, चांगल्या प्रतीचे दूधही महत्त्वाचे असते.
>> त्याला मिल्क पावडरची जोड मिळाली तर दही आवडत नाही म्हणणारेही वाटीभर दही सहज गट्टम करतील हे नक्की!

Web Title: Thik curd recipe: Set homemade curd by this method, you may amazed by the result!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.