रोज उठल्यावर आपल्याला चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. चहाची तलप काहींना अजिबात सहन होत नाही. तज्ज्ञ सांगतात, रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एखादा पौष्टिक पदार्थ खाणे शरीरासाठी फार फायदेशीर ठरते.(This all-in-one juice is beneficial for skin, health and blood, women must drink it) सकाळी उठल्यावर आपण एखादे आरोग्यदायी पेय प्यायला पाहिजे. असेही अनेकदा डॉक्टर आपल्याला सांगतात.
लिंबू पाणी किंवा जिऱ्याचे पाणी प्या असे तज्ज्ञ सांगतात. (This all-in-one juice is beneficial for skin, health and blood, women must drink it)जर तुम्हाला दिवसाची सुरवात अशा पेयानी करता येत नाही तर मग ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. रोज दिवसातून कधीही हा ज्यूस प्या. फायदा नक्की होईलच. इतरही काही चांगल्या सवयी लाऊन घेणे तेवढेच गरजेचे असते. योग्य आहार आणि रोज थोडा व्यायाम करा. त्याबरोबर हा ज्यूस प्यायला सुरवात करा. पोटालाही शांतता मिळेल आणि चवीलाही छान लागतो.
साहित्य
गाजर, पाणी, बीट, लिंबू
कृती
१. गाजराची सालं काढून घ्या तसेच बीटाचीही सालं सोलून घ्या. गाजर आणि बीटाचे बारीक तुकडे करून घ्या.
२. एका मिक्सरमध्ये बीटाचे व गाजराचे तुकडे मिक्स करा. त्यामध्ये थोडा लिंबाचा रस पिळा. त्यामध्ये गरजेपुरते पाणी ओता. मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्या. मस्त पातळ ज्यूस करून घ्या.
३. तुम्हाला चोथा नको असेल तर गाळा. ज्यूस गाळला नाही तरी तो चांगलाच लागतो.
गाजर आणि बीटाचा हा ज्यूस रोज प्यायल्याने त्वचा कमाल सुंदर होते. तसेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातही मदत होईल. शरीराला गरजेची असणारी जीवनसत्वे, खनिजे, लोह, फायबर सगळंच या ज्यूसमधून मिळेल. पोटाचे काही आजार असतील. पोट रोज नीट साफ होत नसेल तर पचन व्यवस्थित होते. शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी बीट उत्तम उपाय आहे. तसेच दृष्टी चांगली राहावी यासाठी गाजर फायदेशीर ठरते.
रक्त शुद्धीकरणासाठीही हा ज्यूस फायदेशीर ठरतो. तसेच शरीर डीटॉक्स करण्यासाठी इतर कोणतेही कष्ट घ्यावे लागणार नाहीत. हा ज्यूस पुरेसा होईल. दिवसातून एक ग्लास प्या आणि कमालीचे फायदे मिळवा.