Join us  

तळकट म्हणून शंकरपाळे खाणं टाळताय? तेलाचा एक थेंबही न वापरता-कढईत तयार करा खुसखुशीत शंकरपाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2023 12:36 PM

This Diwali make baked Shankarpali for your loved ones : फिटनेस फ्रिकही खाऊ शकतील असे हेल्दी ऑइल-फ्री शंकरपाळे करण्याची सोपी कृती

साफसफाई, शॉपिंग, सजावट, फराळ या सगळ्या गोष्टी आवरण्यात कधी दिवाळी (Diwali) जवळ येते कळूनही येत नाही. बरेच जण दिवाळी सुरु होण्याच्या १० ते १५ दिवसाआधी तयारीला लागतात. या सगळ्या गोष्टी आवरण्यात बराच वेळ निघून जातो. तर, काही महिलांचा या गोष्टी करण्यात पिट्ट्या पडतो ते वेगळंच. फराळामध्ये महिला करंजी, शंकरपाळे, चकली, लाडू, चिवडा यासह इतरही बरेच पदार्थ तयार करतात.

मात्र, काही फिटनेस फ्रिक लोकं फराळ कमी प्रमाणात किंवा, खाणं टाळतात. तळकट पदार्थांमुळे वजन तर वाढतेच, शिवाय पोटाचे विकारही वाढतात. पण आपण घरच्या घरी ऑइल-फ्री शंकरपाळे तयार करू शकता. आता तुम्ही म्हणाल न तळता शंकरपाळे कसे तयार करायचे? जर आपल्याला तळकट पदार्थ आवडत नसतील तर, तेलाचा एकही थेंब न वापरता शंकरपाळे ते ही कढईत करून पाहा(This Diwali make baked Shankarpali for your loved ones).

ऑइल-फ्री शंकरपाळे करण्यासाठी लागणारं साहित्य

तूप

पिठीसाखर

गव्हाचं पीठ

मिठाईच्या दुकानात मिळते तशी भरपूर लेअर्सची खस्ता करंजी घरी करायचीय? मग ही सोपी ट्रिक पाहाच, करंजी टिकेल महिनाभर

मैदा

बेसन

रवा

मीठ

कृती

सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये पाउण कप रवाळ तूप घ्या, चमच्याने किंवा व्हिस्करने ४ ते ५ मिनिटांसाठी फेटून घ्या. तूप फेटून झाल्यानंतर त्यात २ कप पिठीसाखर घाला, व व्हिस्करने मिक्स करा. जोपर्यंत मिश्रणाला क्रिमी टेक्चर येत नाही, तोपर्यंत फेटून घ्या. नंतर त्यावर चाळण ठेवा. चाळणीवर एक कप गव्हाचं पीठ, एक कप मैदा, अर्धी वाटी बेसन, अर्धा कप रवा घेऊन चाळून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून हाताने साहित्य एकजीव करा. पण एकजीव करताना कणिक तयार करायची नाही.

भुरभुरीत मिश्रण ठेवायचं आहे. जर हातात घेताच मिश्रणाचा गोळा तयार होत नसेल तर, त्यात २ चमचे तूप घाला. शक्यतो त्यात दूध किंवा पाणी घालू नका. कारण आपण हे शंकरपाळे बेक करून तयार करणार आहोत.

दुसरीकडे पोळपाट लाटणं घ्या, पोळपाटावर एक कप तयार मिश्रण ठेवा, व हाताने एकत्र करत लाटून घ्या. लाटताना आपल्याला वाटेल की मिश्रण पसरत चालले आहे, पण अशावेळी हाताने मिश्रण एकत्र करून जाडसर लाटून घ्या. नंतर सुरीने शंकरपाळ्या कापून घ्या.

कपभर गुळ-शेंगदाण्याचा करा पौष्टिक लाडू ५ मिनिटांत, हिवाळ्यात रोज सकाळी फक्त १ लाडू खाऊन तर पाहा

शंकरपाळ्या कापून झाल्यानंतर स्टीलच्या एका प्लेटवर सुटसुटीत ठेऊन द्या, मात्र स्टीलची प्लेट एका कढईत मावेल अशी घ्या. नंतर कढईत प्लेट ठेवा, व ५ मिनिटांसाठी हाय फ्लेमवर गॅस ठेवा, नंतर मध्यम आचेवर १०-१५ मिनिटांसाठी शंकरपाळे बेक करून घ्या. १५ मिनिटानंतर गॅस बंद करा, व प्लेट बाहेर काढून ठेवा. थंड झाल्यानंतर शंकरपाळे हवाबंद डब्यात साठवून ठेवा. आपण हे शंकरपाळे ओव्हनमध्ये देखील बेक करू शकता. अशा प्रकारे तेलाचा एक थेंबही न वापरता शंकरपाळे खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :दिवाळी 2023अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स