हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी वाढत्या वयानुसार काळजी घेणं गरजेचं आहे (Dryfruits powder). वाढत्या वयामुळे हाडांचे दुखणंही वाढतं. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यामुळे उठता - बसता आपल्याला त्रास होतो (Bone health). हाडांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी दूध पिणं गरजेचं आहे. असं आपण अनेक तज्ज्ञांकडून ऐकलं असेल.
दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम आणि फॉस्फरससारखे अनेक पौष्टीक घटक असतात. पण हाडांसाठी फक्त दूध पुरेसं नाही. यासाठी त्यात एक घरगुती ड्रायफ्रुट्स पावडर घालून प्या. या पावडरमुळे हाडं मजबूत, शरीरातील खनिजांची कमतरता दूर, केस - त्वचा, थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत मिळते(This Dry Fruit Powder Keeps Hair And Bones Strong).
हाडांसाठी अशा पद्धतीने तयार करा ड्रायफ्रुट्स पावडर
लागणारं साहित्य
मखाणा
बदाम
खसखस
अमिताभ बच्चन पाहा रोज कसा करतात व्यायाम, त्यांचे ट्रेनर सांगतात-शिस्त आम्हाला त्यांनी शिकवली कारण..
खजूर
खडी साखर
सुंठ पावडर
ड्रायफ्रुट्स पावडर करण्यासाठी लागणारं साहित्य
सर्वात आधी पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप मखाणा घालून भाजून घ्या. नंतर त्यात एक चमचा तूप घाला. तूप विरघळल्यानंतर मखाणा भाजून घ्या.
मखाणा भाजून घेतल्यानंतर त्यात बदाम आणि खसखस घालून भाजून घ्या. भाजलेलं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर त्यात भाजलेले चणे आणि खजूर घालून भाजून घ्या. खजूरमधील बिया काढून घ्या. नंतर सर्व भाजलेलं साहित्य थंड करण्यासाठी ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य काढून बारीक पावडर तयार करा. नंतर त्यात खडीसाखर घाला. पुन्हा एकदा बारीक करून घ्या. तयार ड्रायफ्रुट्स पावडर एका प्लेटमध्ये काढा. ही पावडर एअर टाईट बरणीत भरून ठेवा. अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स पावडर रेडी.
आता दूध गरम करा. कपभर दुधात १ चमचा ड्रायफ्रुट्स पावडर घाला. सकाळी प्या, यामुळे दिवसभर आपल्या शरीराला उर्जा मिळेल. आपण हे दूध मुलांनाही प्यायला देऊ शकता.
मखाणा खाण्याचे फायदे
आजपासून रोज करा फक्त ३ गोष्टी, महिनाभरात थुलथुलीत पोट आणि कंबरेची साइज होईल कमी
मखाणा हे पोषक तत्वांचे भांडार आहे. यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह आढळते. शिवाय यात कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे वजन वाढत नाही. यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. मखाणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जे हाडे मजबूत करण्याचे काम करते.