गणेशोत्सवामुळे सर्वत्र वातावरण मंगलमय झालं आहे. ढोल - ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पासाठी खास नैवद्य म्हणून अनेकांकडे मोदक, शिरा, लाडू यासह विविध गोड पदार्थ तयार करणायत येतात. मोदक हे गणपती बाप्पांचे प्रिय पदार्थ आहे. मोदक दोन प्रकारचे केले जातात. एक तळणीचे आणि दुसरे उकडीचे. हे दोन्ही मोदक चवीला गोड असतात. पण आपण कधी मोदकाची आमटी करून पाहिली आहे का?
मोदकाच्या आमटीला 'उंबर हंडी' असे देखील म्हणतात. मसालेदर, झणझणीत असा हा पदार्थ चवीला तर भन्नाट लागतोच, व करायला देखील वेळ लागत नाही. मोदकाची आमटी करण्याची योग्य पद्धत कोणती? ती कशी तयार करायची पाहूयात(This Ganeshotsav make Modak Aamti, Spicy Recipe for special Occasion).
मोदकाचे सारण करण्यासाठी लागणारं साहित्य
तीळ
खसखस
सुकं खोबरं
दालचिनी
काळीमिरी
हळद
गोडा मसाला
लाल तिखट
गरम मसाला
धणे - जिरे पूड
मीठ
कृती
मोदकाचं सारण करण्यासाठी सर्वप्रथम, एका कढईत दोन चमचे तीळ, २ चमचे खसखस, व थोडी दालचिनी घालून भाजून घ्या. भाजलेलं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर गरम कढईत सुकं खोबरं घालून भाजून घ्या. भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात अर्धा टेबलस्पून हळद, गोडा मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धणे - जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालून साहित्य एकत्र वाटून घ्या. साहित्य वाटून घेताना त्यात पाणी घालू नका.
मोदकाची पारी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
बेसन
गव्हाचं पीठ
मीठ
हळद
लाल तिखट
धणे - जिरे पूड
तेल
पाणी
कृती
उकडीचे असोत किंवा तळणीचे, मोदकासाठी खास करा ३ प्रकारचे झटपट सारण, चवीला भारी - मोदक होतील चविष्ट
सर्वप्रथम, एका मोठ्या प्लेटमध्ये एक वाटी बेसनाचे पीठ, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, लाल तिखट, धणे - जिरे पूड, व २ चमचे गरम तेल घालून साहित्य एकजीव करा. व गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
आमटीचं वाटण करण्यासाठी लागणारं साहित्य
कांदा
कोथिंबीर
सुकं खोबरं
तेल
लसूण
आलं
गरम मसाला
हळद
लाल तिखट
गोडा मसाला
धणे - जिरे पूड
मीठ
कोथिंबीर
कृती
गरम कढईत २ चमचे तेल घाला. व त्यात लांब बारीक चिरलेला कांदा, ५ ते ७ लसणाच्या पाकळ्या, १ इंच आलं व सुकं खोबरं घालून साहित्य भाजून घ्या, व भाजलेलं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं साहित्य, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, एक चमचा गोडा मसाला, एक चमचा धणे - जिरे पूड, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून पेस्ट तयार करा.
अशा पद्धतीने करा मोदकाची आमटी
उरलेले तेल फेकू नका, करा ४ स्मार्ट उपयोग - महागडे तेल वाया न जाता होतील कामे
कढईत ४ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर १ चमचा जिरं, एक चमचा मोहरी, चिमुटभर हिंग, वाटलेलं वाटण घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात २ कप पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. मोदक तयार करण्यासाठी बेसनाच्या पिठाची पारी तयार करा. एका प्लेटमध्ये सारण घ्या, त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. तयार पारीमध्ये सारण भरून मोदकाचा आकार द्या. व तयार मोदक आमटीमध्ये सोडा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा.