Lokmat Sakhi >Food > विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक...

विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक...

How To Set Thick Curd In Just 10 Minute : दह्याचे काप पडतील इतके घट्टसर दही बनवण्यासाठी आता विरजणाची गरज नाही, नवी ट्रिक वापरून बनवा झटपट तयार होणारे दही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 08:06 PM2023-08-11T20:06:55+5:302023-08-11T20:21:56+5:30

How To Set Thick Curd In Just 10 Minute : दह्याचे काप पडतील इतके घट्टसर दही बनवण्यासाठी आता विरजणाची गरज नाही, नवी ट्रिक वापरून बनवा झटपट तयार होणारे दही...

This Is How You Can Make Thick Creamy Curd In Just 10 Minutes. | विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक...

विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक...

दही खाणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. भारतीय स्वयंपाकामध्ये कढी, ताक, मठ्ठा, कोशिंबिरीमध्ये दह्याचा वापर केला जातो. निरोगी आणि सृदृढ शरीरप्रकृतीसाठी दररोजच्या आहारात कमीतकमी एक वाटी दह्याचा जरूर समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. सध्या बाजारात विविध ब्रॅन्डचे फ्लेवर्ड दही सहज उपलब्ध होते. परंतु घरी बनवलेल्या दह्याची चव आणि ते खाण्याची गंमत काही वेगळीच असते.

काहीवेळा आपण विकतचे दही बाहेरुन आणतो, मात्र हे दही बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा डब्यांतून दिले जाते. बाहेरुन विकत आणलेले दही कधी पातळ, पाणचट किंवा आंबट असते. त्यामुळे घरीच दही तयार करणं हे नेहमीच चांगलं. मुळात दही तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी पाच ते दहा मिनीटांमध्ये आपण दह्याला विरजण लावू शकता. मात्र कधी कधी घरी लावलेलं दही घट्ट तयार होत नाही. यासाठी आपण दह्याला विरजण लावण्याची पारंपरिक पद्धत न वापरता एक नवीन सोपी ट्रिक करुन पाहा. ही सोपी ट्रिक वापरल्याने आपल्याला दही जमून येण्यासाठी संपूर्ण रात्रभर वाट बघावी लागणार नाही, याउलट केवळ १० ते १५ मिनिटांत दही बनून खाण्यासाठी तयार होईल(This Is How You Can Make Thick Creamy Curd In Just 10 Minutes).

केवळ १० मिनिटांत झटपट दही बनवण्याची सोपी कृती... 

१. सर्वप्रथम एक मातीचे किंवा स्टीलचे छोटे भांडे स्वच्छ धुवून घ्यावे. 
२. या भांड्यात चमचाभर दही घालून ते फूड ब्रशच्या मदतीने आतून संपूर्ण भांड्याला पसरवून लावून घ्यावे. 
३. त्यानंतर एका वेगळ्या भांड्यात दूध गरम करून व्यवस्थित उकळवून घ्यावे. 
४. हे उकळलेले दूध कोमट होईपर्यंत बाजूला ठेवून द्यावे. 

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

सकाळचा पहिला चहा बिघडला-पांचट झाला तर मूड जातोच, ४ टिप्स- चहा होईल फक्कड...

५. हे उकळवून घेतलेले दूध किंचित कोमट झाल्यावर त्यात एक चमचाभर दही घालून घ्यावे. 
६. या कोमट दुधात चमचाभर दही घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिसळून घ्यावे. 
७. आता हे दही मिसळलेले दूध, आतून दही पसरवून लावलेल्या भांडण्यात ओतून घ्यावे. त्यानंतर या भांड्याला अल्युमिनियम फॉईल लावून त्याचे तोंड चारही बाजुंनी व्यावस्थित झाकून घ्यावे. 

पावसाळ्यात खायला हवीच बाजरीची खिचडी ! पारंपरिक - अस्सल मराठी पौष्टिक पदार्थ, करून पाहा...

तेलाच्या बाटलीची कॅप काढून फेकून देता ? इतके दिवस आपले चुकले 'असे ' वाटेल, पाहा कॅपचा उपयोग...

८. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन ते गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्यावे. या पाण्याला हलकी वाफ आल्यानंतर त्यात अल्युमिनियम फॉईल लावून घेतलेले भांडे ठेवावे व त्यानंतर या भांड्यावर झाकण ठेवून ५ मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावे. 
९. ५ मिनिटानंतर झाकण उघडून हे भांङे काढून घ्यावे, आपले दही खाण्यासाठी तयार आहे. 

अशा पद्धतीने आपण झटपट विरजण न लावता, दही जमून येण्यासाठीची वाट न बघता अगदी सहज सोप्या पद्धतीने दही बनवू शकता.

Web Title: This Is How You Can Make Thick Creamy Curd In Just 10 Minutes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.