'बटाटा' हा असा पदार्थ आहे की जो घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. घरात कोणती भाजी नसली किंवा ऐनवेळी काही बनवायचे झालेच तर बटाटा वापरून आपण झटपट होणारे पदार्थ बनवू शकतो. रोजच्या जेवणात आपण थोडा का होईना बटाटा वापरतोच. कडधान्य असो किंवा पालेभाजी, भाजी कोणतीही असो त्यामध्ये बटाटा दिसतोच. बहुतेक स्नॅक्सचे पदार्थ बनवताना जसे की वडापाव, समोसा, पावभाजी, पाणीपुरी, मसाला डोसा किंवा मग पराठा हे सर्व पदार्थ बनवताना बटाट्याचा वापर केला जातो.
आपल्याकडे बटाटा हा सगळ्या कंदमुळांचा राजा मानला जातो. कारण कोणतीही भाजी किंवा पदार्थ त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही असेच म्हणावे लागेल. सध्या श्रावण महिना सुरु झाला असल्यामुळे, आपल्याकडे सणांची रेलचेल पाहायला मिळते. श्रावण महिन्यातील सण म्हटले की उपास - तापास आलेच. उपवास म्हटलं की त्यात सगळ्यात पाहिलं आपल्या डोळ्यासमोर येतात ते बटाटा व साबुदाण्याचे उपवासाचे पदार्थ. उपवासा दरम्यान आपल्याकडे सर्वात जास्त प्रमाणांत खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बटाटा. उपवासाचे पदार्थ हे बटाट्याशिवाय अधुरेच आहेत. असे पदार्थ बनवताना आपण बहुतेकवेळा बटाटा उकडून घेतो. या उकडलेल्या बटाट्याच्या (How to Peel Potatoes: Easy Ways to Peel a Potato) साली काढून घेण्यासाठी आपल्याला बटाटा थंड होण्याची वाट बघावी लागते. यासाठी उकडलेला बटाटा गरम असतानाच सोलून घेण्यासाठीची एक सोपी ट्रिक लक्षात घेऊयात(This Is the Fastest Way to Peel a Bunch of Potatoes at Once).
उकडलेला बटाटा गरम असतानाच सोलून घेण्यासाठीची एक सोपी ट्रिक...
बहुतेक पदार्थ बनवताना आपण त्यात बटाट्याचा वापर करतोच. हे पदार्थ बनवताना बरेचदा आपण बटाटा उकडवून घेतो. बटाटा उकडवून घेण्यासाठी आपण त्याचे दोन भाग करून तो पाण्यांत घालून कुकरमध्ये उकडवण्यासाठी ठेवून देतो. असे बटाटे उकडल्यानंतर त्याची साल काढण्यासाठी ते थंड होईपर्यंत आपल्याला कधी कधी वाट बघावी लागते. याचबरोबर, घाईगडबडीच्या वेळी आपल्याकडे एवढा वेळ नसतो. अशावेळी नेमकं काय करावे हे समजात नाही. बटाट्याच्या साली काढून तो उकडवण्यासाठी ठेवला असता तो पचपचीत होतो. यासाठी एक सोपी ट्रिक लक्षात घेऊयात.
उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...
१. उकडलेल्या गरम बटाटयाची सालं काढताना, आपला हात अनेकदा भाजतो किंवा काहीवेळा बटाटे थंड होईपर्यंत पुरेसा वेळ नसतो अशावेळी काटा चमचा व चिमट्याच्या मदतीने आपण गरम बटाटयाची सालं झटपट काढू शकतो.
२. सर्वप्रथम उकडवून घेतलेले बटाटे एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावेत.
३. त्यानंतर एक काटा चमचा घेऊन त्यात उकडलेला बटाटा व्यवस्थित अडकवून घ्यावा.
बाजारातून विकत आणलेले लादी पाव ताजे आहेत की शिळे हे कसे ओळखाल ? ८ टिप्स, खा ताजे मऊ पाव...
मिक्सर न वापरता करा हिरवीगार इन्स्टंट हिरवी चटणी, एक आयडिया भन्नाट मिनिटांत चटणी रेडी...
ग्रेव्हीत दही घातल्यानंतर ते फुटू नये म्हणून मास्टर शेफ पंकज भदौरिया सांगतात ३ सोप्या ट्रिक्स...
४. बटाटा काटा चमच्यात अडकवून घेतल्यानंतर, एका हातात तो काटा चमचा पकडावा व दुसऱ्या हातात चिमटा घेऊन त्या चिमट्याने उकडलेल्या बटाटयाच्या साली अलगद काढून घ्याव्यात.
५. याचबरोबर बटाटे उकडून घेतल्यानंतर, ते लगेच बर्फाच्या थंड पाण्यांत काही मिनिटे बुडवून ठेवावे यामुळे देखील बटाटयाच्या साली अगदी झटपट निघण्यास मदत होईल.
६. अशाप्रकारे आपण उकडलेल्या गरम बटाट्यांना हात न लावता अगदी मिनिटभरात त्याची सालं सहजरित्या काढू शकता.