गुगलच्या कृपेमुळे आजकाल कोणताही नवा पदार्थ शिकणे अगदी सोपे झाले आहे. काही वर्षांपुर्वी जेव्हा गुगलचा एवढा वापर नसायचा तेव्हा सर्वसामान्य महिला एखादा नवा पदार्थ शिकण्यासाठी त्यांच्या मैत्रिणींवर, घरातल्या मोठ्या स्त्रियांवर अवलंबून असायच्या. त्यांनी सांगितलेली रेसिपी मग जशीच्यातशी फॉलो व्हायची आणि तो पदार्थ केला जायचा. पण जसं कोरोनामुळे लॉकडाऊन आलं तसं गुगलवर शोधल्या जाणाऱ्या रेसिपींचं प्रमाण प्रचंड वाढलं. आता लॉकडाऊन नसलं तरी गुगलवर शोधून (google search) रेसिपी (recipe) ट्राय करून बघण्याचा ट्रेण्ड मुळीच कमी झालेला नाही.
लॉकडाऊनपासून अनेक गृहिणींना वेगवेगळ्या नवनविन पदार्थांची रेसिपी गुगलवरून माहिती करून घ्यायची आणि तो पदार्थ करून बघायचा, ही सवयच लागली आहे.
काकूंनी केला भन्नाट कोंबडी डान्स! लग्नात इतक्या जबरदस्त नाचल्या की... पाहा व्हायरल व्हिडिओ
आता प्रत्येकाचा चॉईस वेगळा असला तरी साधारणपणे जो पदार्थ ट्रेण्डिंग असतो, ताेच पदार्थ बहुसंख्य लोकांकडून शोधला जातो. तसंच आता यावर्षी पनीर पसंदा (paneer pasanda) ही पनीरची डिश ट्रेण्डिंग होती. त्यामुळे २०२२ यावर्षी पनीर पसंदा गुगलवर सगळ्यात जास्त शोधली गेलेली रेसिपी ठरली आहे. भारतासह पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांमधून या डिशविषयी सगळ्यात जास्त शोध घेण्यात आला.
गुगलच्या “Top Recipes” या सेक्शनमध्ये पनीर पसंदाचा उल्लेख क्रमांक एक वर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ५ पदार्थ ेदेण्यात आले आहेत.
बाळंतपणानंतर एका महिन्यातच आलिया भटने सुरू केला योगा, बघा डिलिव्हरीनंतर अभिनेत्रींनी कसा केला वेटलॉस
त्यापैकी दुसऱ्या स्थानावर “Bolo caseiro” हा केकचा प्रकार आहे. तर तिसऱ्या स्थानावर “Tuzlu kurabiye” हे तुर्की बिस्किट आहे. चौथ्या स्थानावर “Overnight Oats” असून पाचव्या स्थानावर “Zimtschnecken” हा जर्मन पदार्थ आहे.