Lokmat Sakhi >Food > डाळ शिजतानाच मीठ घालावं की नंतर? पोषण भरपूर मिळायचे तर पाहा डाळ शिजवण्याची योग्य पद्धत

डाळ शिजतानाच मीठ घालावं की नंतर? पोषण भरपूर मिळायचे तर पाहा डाळ शिजवण्याची योग्य पद्धत

This is the right time to add salt and turmeric to Dal : बरेच लोक डाळ चुकीच्या पद्धतीने शिजवतात; डाळीतील पौष्टीक घटक नष्ट होऊ नये म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2024 07:42 PM2024-08-20T19:42:24+5:302024-08-20T19:43:17+5:30

This is the right time to add salt and turmeric to Dal : बरेच लोक डाळ चुकीच्या पद्धतीने शिजवतात; डाळीतील पौष्टीक घटक नष्ट होऊ नये म्हणून..

This is the right time to add salt and turmeric to Dal | डाळ शिजतानाच मीठ घालावं की नंतर? पोषण भरपूर मिळायचे तर पाहा डाळ शिजवण्याची योग्य पद्धत

डाळ शिजतानाच मीठ घालावं की नंतर? पोषण भरपूर मिळायचे तर पाहा डाळ शिजवण्याची योग्य पद्धत

पदार्थात डाळीचा वापर जवळ जवळ अनेक घरांमध्ये होतो (Cooking Tips). डाळी अनेक प्रकारचे असतात. डाळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. डाळीमध्ये फायबर मुबलक प्रमाण असते (Kitchen Tips). ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस सारख्या समस्यांपासून बचाव होतो. शिवाय डाळी लोह, जस्त, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात.

त्यामुळे एकंदरीत आरोग्य सुधारण्यास आणि शरीराच्या विविध कार्यांमध्ये मदत करतात. पण डाळीचे पदार्थ करताना त्यात विशिष्ट पदार्थ घालू नये. ज्यामुळे डाळीची चव, पोषण आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांनी डाळ शिजताना त्यात कोणती गोष्ट घालू नये यांची माहिती दिली आहे(This is the right time to add salt and turmeric to Dal).

डाळीत काय घालू नये?

आंबट पदार्थ


डाळ शिजताना त्यात लिंबाचा रस, टोमॅटो किंवा चिंच यांसारख्या आंबट पदार्थ घालू नयेत. आंबट घटक डाळी शिजण्याची प्रक्रिया मंद करू शकते. ज्यामुळे डाळी लवकर शिजत नाहीत. त्यामुळे डाळीमध्ये आंबट पदार्थ घालायचे असेल तर, डाळ शिजल्यावर घाला.

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

मीठ

मिठामुळे डाळीची चव वाढते. पण डाळीत मीठ योग्यवेळी घालणे महत्वाचे आहे. डाळ शिजण्याआधी किंवा सुरुवातीला मीठ घातल्याने डाळी नीट शिजत नाहीत. त्यामुळे नेहमी डाळ शिजल्यानंतर मीठ घालावे. जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजेल.

बेसन  किंवा मैदा

काही लोक डाळ घट्ट करण्यासाठी बेसन किंवा मैदा घालतात. पण यामुळे डाळीतील नैसर्गिक पौष्टिक मूल्य कमी होऊ शकतात. ज्यामुळे अपचन किंवा पोटाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. डाळ नैसर्गिकरित्या घट्ट होण्यासाठी मंद आचेवर शिजवा.

वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..

हिरव्या भाज्या

ताज्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर पोषण असले तरी ते शिजवताना डाळीत घालू नये. भाज्या लवकर शिजतात आणि डाळी लवकर शिजत नाहीत. त्यामुळे भाज्यांची पोषकतत्त्वे नष्ट होतात. डाळीत भाज्या घालायच्या असतील तर वाफवून घ्या. शेवटी डाळीमध्ये घाला. 

Web Title: This is the right time to add salt and turmeric to Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.