Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात दही खावे की अजिबात खाऊ नये ? एक्स्पर्ट सांगतात, खरंखुरं उत्तर-दही आवडत असेल तर..

पावसाळ्यात दही खावे की अजिबात खाऊ नये ? एक्स्पर्ट सांगतात, खरंखुरं उत्तर-दही आवडत असेल तर..

This is the right way to consume curd during monsoons : पावसाळ्यात दही खाऊन सर्दी - खोकला होईल म्हणून घाबरता? एक्स्पर्ट सांगतात दही खाण्याची योग्य पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2024 06:55 PM2024-07-16T18:55:50+5:302024-07-16T19:21:37+5:30

This is the right way to consume curd during monsoons : पावसाळ्यात दही खाऊन सर्दी - खोकला होईल म्हणून घाबरता? एक्स्पर्ट सांगतात दही खाण्याची योग्य पद्धत...

This is the right way to consume curd during monsoons Unveiling the truth behind eating curd in monsoon | पावसाळ्यात दही खावे की अजिबात खाऊ नये ? एक्स्पर्ट सांगतात, खरंखुरं उत्तर-दही आवडत असेल तर..

पावसाळ्यात दही खावे की अजिबात खाऊ नये ? एक्स्पर्ट सांगतात, खरंखुरं उत्तर-दही आवडत असेल तर..

सध्या पावसाला सगळीकडेच जोरदार सुरुवात झाली आहे. पावसाळा म्हटलं की रोगराई, आजारपण अशा अनेक समस्या तो आपल्यासोबत घेऊन येतोच. पावसाळयात अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका अधिक असतो. यासाठीच पावसाळ्यात आरोग्याची तसेच आपल्या खाण्या - पिण्याची काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पावसाळ्यात काही पदार्थ खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. या ऋतूंत आपण शक्यतो पचायला हलके असणारे व तेलकट नसलेले पदार्थ खाण्याला प्राधान्य देतो. पावसाळ्यात काही पदार्थ खाल्ले जात नाहीत यात दह्याचा (Curd) देखील समावेश होतो. 

दही हा आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्वाचा पदार्थ मानला जातो. बऱ्याचदा जेवणात रायता, लस्सी, ताक आणि गोड दही असे पदार्थ असतातच. याचबरोबर पचनक्रिया चांगली राहण्यासाठी काहीजण रोज दही खातात. त्यामुळे चयापचय आणि आरोग्याला चालना मिळते. दही खाणे हे आपल्या रोग्याचा दृष्टीने खूपच फायदेशीर मानले जाते. परंतु पावसाळ्यात (Should You Avoid Curd When it Rains? An Expert Fact Checks Monsoon Health Myths) दही खावे की खाऊ नये असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पावसाळ्यात दही खाल्ले तर नेमके काय होते? किंवा पावसाळ्यात दही खायचे असल्यांस ते खाण्याची योग्य पद्धत कोणती? यासंदर्भात, डॉक्टर अमृता यांनी इंस्टाग्रामवर त्यांच्या अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्याबद्दल अधिक माहिती घेऊयात(This is the right way to consume curd during monsoons).

पावसाळ्यात दही खाण्याची योग्य पद्धत कोणती ? 

१. दही थंड आणि शिळे नसावे :- पावसाळ्यात आपण दही खाऊ शकता. परंतु या ऋतूंत दही खाताना योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. दही फ्रिजमध्ये ठेवलेले नसावे. शक्यतो फ्रिजमध्ये ठेवलेले थंड दही पावसाळ्यात खाऊ नये यामुळे आपल्याला सर्दी, खोकला किंवा घसा खवखवण्याची समस्या उद्भवू शकते. याचबरोबर पावसाळ्यात शिळे दही खाणे टाळावे. नेहमी रोजच्या रोज ताजे लावलेले घरगुती फ्रेश दही खावे. 

२. दही दुपारी खावे :- पावसाळ्यात जर तुम्हाला दही खायचे असेल तर ते शक्यतो दुपारच्या जेवणाच्यावेळी खावे. या ऋतूत दही रात्री खाणे टाळावे. रात्रीच्या वेळी दही खाल्याने पचनासंबंधीत अनेक तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते. याचबरोबर दही खाल्ल्याने कफ होऊ नये म्हणून यात चिमूटभर काळीमिरीची पूड मिक्स करून खावे. 

मुसळधार कोसळणाऱ्या पावसांत कुठे अडकलात तर? कायम बॅगेत ठेवा ५ वस्तू, राहा सुरक्षित रोजच...

३. दही कमी प्रमाणात खावे :- दही खाताना ते शक्यतो कमी प्रमाणातच खावे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्यात डेअरी प्रॉडक्ट्स जसे की, दूध, दही हे कमी प्रमाणातच खावे. पावसाळ्यात आपली पचनक्रिया थोडी मंदावते. त्यातच जर आपण या ऋतूंत दही - दूध खाल्ले तर मेटाबॉलिझम बिघडू शकते. यामुळे अ‍ॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यामुळे पोटात संसर्ग होण्याचा धोकाही बराच वाढतो. अशा परिस्थितीत दही कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.

विराट कोहलीला आवडते तसे ‘प्रोटीन सॅलेड’ करा, वजन राहते नियंत्रणात आणि पचायला हलके-पौष्टिकही...

Web Title: This is the right way to consume curd during monsoons Unveiling the truth behind eating curd in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.