Lokmat Sakhi >Food > नवरात्रात पोटभर खा वरीच्या तांदळाचा उपमा, पित्ताचा त्रास नाही -पचायला हलके-वजनही होईल कमी

नवरात्रात पोटभर खा वरीच्या तांदळाचा उपमा, पित्ताचा त्रास नाही -पचायला हलके-वजनही होईल कमी

This Navratri Make Vari Rice Upma-note down Recipe : साबुदाण्यानं त्रास होतो तर भगर म्हणजे वरीच्या तांदळाचा उपमा खा, पोटभर पौष्टिक फराळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 01:45 PM2023-10-16T13:45:01+5:302023-10-16T13:54:31+5:30

This Navratri Make Vari Rice Upma-note down Recipe : साबुदाण्यानं त्रास होतो तर भगर म्हणजे वरीच्या तांदळाचा उपमा खा, पोटभर पौष्टिक फराळ

This Navratri Make Vari Rice Upma-note down Recipe | नवरात्रात पोटभर खा वरीच्या तांदळाचा उपमा, पित्ताचा त्रास नाही -पचायला हलके-वजनही होईल कमी

नवरात्रात पोटभर खा वरीच्या तांदळाचा उपमा, पित्ताचा त्रास नाही -पचायला हलके-वजनही होईल कमी

नवरात्रच्या (Navratri) दिवसात अनेक जण उपवास धरतात. काही उठता-बसता तर काही नऊ दिवस उपवास धरतात. उपवासादरम्यान बरेच लोकं साबुदाण्याचे पदार्थ खातात. पण नेहमी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, साबुदाण्याची खीर खाऊन कंटाळा आला असेल तर, आपण वरीच्या तांदुळाचा उपमा करून खाऊ शकता.

वरीच्या तांदुळाला अनेक ठिकाणी भगरही म्हणतात. साबुदाण्याच्या तुलनेत भगर पौष्टीक असते, याने वजन वाढत नाही. भगरमध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, व्हिटॅमिन ‘सी’, ‘ए’ आणि ‘इ’ आढळते. मुख्य म्हणजे भगर ग्लुटेन फ्री असल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. सहसा वरीच्या तांदुळाचा भात केला जातो. पण नाश्त्यासाठी किंवा लंचमध्ये आपण उपमाही करून खाऊ शकता. वरीच्या तांदुळाचा उपमा कसा करायचा पाहूयात(This Navratri Make Vari Rice Upma-note down Recipe).

उपवासाचा उपमा करण्यासाठी लागणारं साहित्य

वरीचा तांदूळ

काजू

ज्वारीच्या पिठाची भाकरी नेहमीचीच, करून पाहा कपभर पीठाचे खुसखुशीत वडे, पौष्टीक नाश्ता १० मिनिटात रेडी

जिरं

हिरवी मिरची

बटाटा

पाणी

मीठ

साखर

शेंगदाण्याचं कूट

कृती

सर्वप्रथम, कढईमध्ये एक चमचा तूप घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात काजूचे तुकडे, एक चमचा जिरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला बटाटा घालून परतवून घ्या. त्यानंतर त्यात एक कप वरीचा तांदूळ घालून भाजून घ्या. 
मध्यम आचेवर वरीचा तांदूळ भाजून झाल्यानंतर त्यात एक कप पाणी, चवीनुसार मीठ, साखर व दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करा.

आप्पे पात्रात ढोकळा करण्याची पाहा भन्नाट ट्रिक, करा मिनी ढोकळा झटपट

पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून वरीचा तांदूळ छान फुलेल. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा, व थंड झाल्यानंतर उपवासाच्या उपम्याचा आस्वाद घ्या. 

Web Title: This Navratri Make Vari Rice Upma-note down Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.