Lokmat Sakhi >Food > भारतीय राजमा ठरला जगात भारी, 'बेस्ट बिन्स डिश' म्हणून मिळाली ओळख, राजमा चावलचा खास स्वाद

भारतीय राजमा ठरला जगात भारी, 'बेस्ट बिन्स डिश' म्हणून मिळाली ओळख, राजमा चावलचा खास स्वाद

This popular Indian staple ranks in TasteAtlas’s top 50 bean dishes worldwide. Can you take a guess? : राजमा खिशाला परवडणारा आणि चवीलाही रुचकर पदार्थ आहे; याचे आरोग्यदायी फायदे किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2024 04:31 PM2024-11-21T16:31:59+5:302024-11-21T16:38:29+5:30

This popular Indian staple ranks in TasteAtlas’s top 50 bean dishes worldwide. Can you take a guess? : राजमा खिशाला परवडणारा आणि चवीलाही रुचकर पदार्थ आहे; याचे आरोग्यदायी फायदे किती?

This popular Indian staple ranks in TasteAtlas’s top 50 bean dishes worldwide. Can you take a guess? | भारतीय राजमा ठरला जगात भारी, 'बेस्ट बिन्स डिश' म्हणून मिळाली ओळख, राजमा चावलचा खास स्वाद

भारतीय राजमा ठरला जगात भारी, 'बेस्ट बिन्स डिश' म्हणून मिळाली ओळख, राजमा चावलचा खास स्वाद

राजमा (Rajma). या बिन्सला आता अंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे (Comfort Food). प्लेन भातासोबत राजमा आवर्जुन खाल्ला जातो. याच 'कम्फर्ट फूड'ला जागतिक बेस्ट बिन डिश म्हणून ओळख मिळाली आहे (Cooking Tips). राजमा या बिन्सला टेस्ट अॅटलास या जगातील ५० सर्वोत्कृष्ट बीन डिशमध्ये १४ वा क्रमांक मिळाला आहे.

गेल्या वर्षीपासून १८ व्या क्रमांकावरून १४ व्या क्रमांकावर आल्याने, राजमाला जागतिक पसंती मिळत असल्याचं दिसून आलं आहे(This popular Indian staple ranks in TasteAtlas’s top 50 bean dishes worldwide. Can you take a guess?).

हिवाळ्यात फक्कड चहा हवाय? त्यात घालं '१' पदार्थ; आरोग्य राहील सुदृढ; सर्दी - खोकलाही राहील दूर

भारतीय राजमाचं विशेष कौतुक कारण..


राजमाला जगातील ५० सर्वोत्कृष्ट बीन डिशमध्ये १४ वा क्रमांक मिळाल्याने, शेफ निशांत चौबे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 'राजमा हा पोटभरीचा उत्कृष्ट पदार्थ आहे. राजमा हा खरंतर भारतीय बिन्स नाही. राजमाचा उगम मेक्सिको आणि ग्वाटेमाला येथे झाला होता. नंतर १५व्या-१६व्या शतकादरम्यान युरोपियन व्यापाऱ्यांनी भारतात आणले'

शेफ चौबे पुढे म्हणतात, 'त्या काळापासून स्थानिक लोक राजमा आवडीने खाऊ लागले. विविध मसाले, तूप घालून त्याची उसळ करू लागले. भाताबरोबर राजमा हे कॉम्बिनेशन आजही तितकेच फेमस आहे.'

स्टॉरंट्सपासून ते स्थानिक ढाब्यांपर्यंत, राजमा सर्वत्र उपलब्ध आहे. राजमाबद्दल शेफ रीतू उदय कुगाजी म्हणतात, 'राजमाची उसळ करण्यापूर्वी बिन्स रात्रभर भिजत ठेवावे. त्यानंतरच त्याचा वापर करावा. नंतर कांदा, आले, लसूण, टोमॅटो आणि मसाल्यांचा वापर करून राजांची उसळ आपण करू शकता. आपण त्यात ग्रेव्ही घालूनही करू शकता.'

शेफ पुढे म्हणतात, 'राजमा पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये फार फेमस आहे. त्यांच्या आहारामध्ये राजमा असतोच. ही डिश प्रत्येक प्रदेशात प्रवास करताना काही बदल घडवून आणते. काश्मीरमध्ये राजमा दही आणि बडीशेप घालून बनवला जातो. काश्मिरी लाल मिरची पावडर देखील त्यात घातली जाते.'

राजमा खाण्याचे फायदे

- राजमा खिशाला परवडणारे बिन्स आहे. राजमा कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. याव्यतिरिक्त यात प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स सारख्या अनेक आवश्यक पोषक तत्त्वांचा भांडार आहे.

बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

- राजमा प्रोबायोटिक म्हणून काम करते. म्हणजे ते खाल्ल्याने पचनक्रिया हळू होते, जेणेकरून आपले शरीर प्रत्येक आहाराचे पोषण अॅब्जार्ज करू शकेल.

- प्रथिने, फायबरने समृद्ध असलेला राजमा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. राजमा खाल्ल्याने टाइप -२ मधुमेहाचा धोका कमी होतो.

 

Web Title: This popular Indian staple ranks in TasteAtlas’s top 50 bean dishes worldwide. Can you take a guess?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.