Join us  

तुळशी विवाहनिमित्त कपभर गव्हाच्या पिठाचा करा पौष्टीक शिरा, तोंडात घालताच विरघळेल-आरोग्यासाठी उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2023 1:58 PM

This Tulsi Vivah make delicious wheat flour halwa recipe : रव्याचा शिरा नेहमीचाच, यंदा अचूक प्रमाणात गव्हाच्या पिठाचा शिरा करून पाहा..

हिंदू धर्मात तुलसी विवाहाला (Tulsi Vivah) विशेष महत्त्व आहे. दिवाळी (Diwali) सरली की लोकांना तुळशी विवाहाचे वेध लागते. यावर्षी २४ नोव्हेंबर रोजी तुलसी विवाहाच्या मुहूर्ताला सुरुवात होणार आहे. तुलसी विवाह दरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांचा वापर केला जातो. तुळशी विवाहासाठी घरोघरी काहीतरी गोड पदार्थ केला जातो. काही जण पंचामृत, मलाई पेढा, किंवा गव्हाच्या पिठाचा शिरा तयार करतात.

आपण देखील तुळशी विवाहनिमित्त गव्हाच्या पिठाचा शिरा तयार करू शकता. अमृतसरचा हा प्रसिद्ध गोड पदार्थ झटपट तयार होतो. शिवाय हा पदार्थ स्वयंपाकघरात सहजपणे आढळणा-या सामग्रीपासून (Cooking Tips) तयार होतो. गव्हाच्या पिठाचा शिरा आरोग्यासाठी हेल्दी मानला जातो. रव्याचा गोड शिरा आपण खाल्लंच असेल तर, आता तुळशीच्या लग्नाचे औचित्य साधून घरीच खास गव्हाच्या पीठाचा शिरा तयार करा(This Tulsi Vivah make delicious wheat flour halwa recipe).

गव्हाच्या पिठाचा शिरा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

साखर/गुळ

तूप

२ बटाटे-२ टोमॅटो, तरला दलाल स्पेशल 'बटाटा मुसल्लम' ही अनोखी डिश नक्की करायची कशी? पाहा युनिक डिशची सोपी कृती

दूध

ड्रायफ्रुट्स

नारळाचा किस

वेलची पावडर

कृती

सर्वप्रथम, गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात एक कप गव्हाचं पीठ घालून मध्यम आचेवर भाजून घ्या. गव्हाच्या पिठाचा शिरा करताना जाड पिठाचा वापर करा, जेणेकरून पीठ कढईच्या तळाशी चिकटणार नाही. गव्हाच्या पिठाला सोनेरी रंग आल्यानंतर, त्यात अर्धा कप पिठीसाखर किंवा गुळ पावडर घालून मिक्स करा.

रोजची भाजी खाऊन कंटाळलात? वाटीभर काळ्या वाटाण्याची करा चमचमीत उसळ, चवीला भारी-हेल्दी रेसिपी

नंतर त्यात दीड कप दूध, बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स, नारळाचा किस आणि वेलची पावडर घालून सर्व साहित्य एकजीव करा, व चमच्याने सतत ढवळत राहा, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाही. ५ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर त्यावर ड्रायफ्रुट्स पसरवून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे पौष्टीक गव्हाच्या पिठाचा शिरा खाण्यासाठी रेडी.

गव्हाच्या पिठाचा शिरा खाण्याचे गोड फायदे

गव्हाच्या पीठाचा शिरा खाण्याचे फायदे अनेक आहेत. हा शिरा तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर होतो, ज्यामुळे हा शिरा पचायला हलका असतो. मात्र, शिरा खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये, नाहीतर पचण्यास त्रास होऊ शकतो. शिरा करण्यासाठी तुपाचा वापर होतो, तूप केस, त्वचा आणि आरोग्यासाठी हेल्दी मानले जाते. शिवाय शिरा करताना आपण साखर नसून गुळाचा वापर करतो. गुळ पचनक्रिया मजबूत करते, वजन कमी करते, शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

टॅग्स :दिवाळी 2023अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स