Join us  

फोडणीचा भात कशाला, उरलेल्या भाताचे करा क्रिस्पी मंचुरियन, चव अशी की लोकं आवडीने खातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 3:09 PM

This Weekend make Leftover Rice Manchurian with Vegetables : कोबीचे मंचुरियन खाल्ले असतील, आता उरलेल्या भाताचे मंचुरियन करून पाहा..

प्रत्येक घरात रात्रीचं जेवण सकाळी उरते. घरातील गृहिणी अधिकच्या पोळ्या किंवा भात तयार करते. कारण कधी कधी जेवण पुरत नाही. अनेकदा भात उरते. मात्र, शिळा भात (Leftover Rice) खायला कोणी मागत नाही. शिळा भात खाताना घरातील सदस्य नाक मुरडतात. अशा वेळी शिळ्या भाताचे करायचं काय असा प्रश्न पडतो. शिळ्या भाताचे अनेक जण फोडणीचा भात तयार करतात. शिवाय बरेच जण त्याचे विविध पदार्थ तयार करतात.

पण आपण शिळ्या भाताचे मंचुरियन (Manchurian) तयार करू शकता. आता तुम्ही म्हणाल शिळ्या भाताचे ते ही मंचुरियन कसे तयार होतील? पण जर घरातील सदस्य शिळा भात खाताना नखरे करत असतील तर, त्यांना खास शिळ्या भाताचे चमचमीत मंचुरियन तयार करून द्या. कुरकुरीत चविष्ट मंचुरियन लहानग्यांना नक्कीच आवडेल(This Weekend make Leftover Rice Manchurian with Vegetables).

उरलेल्या भाताचे मंचुरियन करण्यासाठी लागणारं साहित्य

उरलेला भात

गाजर

कोबी

सिमला मिरची

कांदा

हिरव्या मिरचीचा ठेचा नेहमीचाच, कपभर हिरव्या मुगाचा करून पाहा झणझणीत ठेचा, तोंडी लावण्यासाठी बेस्ट

रवा

मैदा

मीठ

आलं-लसूण पेस्ट

चिली सॉस

सोया सॉस

तेल

शेजवान सॉस

फ्राईड नूडल्स

कांद्याची पात

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप रात्रीचा उरलेला भात, बारीक चिरलेला गाजर, कोबी, सिमला मिरची, कांदा घालून मिक्स करा. नंतर त्यात एक कप रवा, मैदा, चवीनुसार मीठ, आलं-लसूण पेस्ट, चिली सॉस, सोया सॉस घालून सर्व साहित्य एकजीव करा. तयार मिश्रणाचे लहान गोळे तयार करा. दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा.

साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट

तेल गरम झाल्यानंतर त्यात मंचुरियन बॉल्स सोडून मध्यम आचेवर तळून घ्या. तळलेले मंचुरियन बॉल्स एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक चमचा शेजवान सॉस, फ्राईड नूडल्स, बारीक चिरलेली कांद्याची पात घालून मिक्स करा. अशा प्रकारे उरलेल्या भाताचे कुरकुरीत चविष्ट मंचुरियन खाण्यासाठी रेडी.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स