Join us  

विकेंडला बनवा खमंग पारंपारिक पाटवडी, कमी साहित्यात - कमी वेळात डिश तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2023 7:11 PM

This Weekend make Patwadi Recipe घरात अचानक पाहुणे आले? किंवा हटके काहीतरी खाण्याची इच्छा झाली? कमी साहित्यात बनवा पाटवडी..

जेवणात रोज नवीन काय बनवावं हे महिलांना सुचत नाही. तेच तेच पदार्थ खाऊन घरातील सदस्य व आपण देखील कंटाळतो. तिच भाजी - आमटी, भाकरी - चपाती, भात खाऊन कंटाळा येणं स्वाभाविक आहे. जिभेला नवीन पदार्थ खाण्याची सवय झालेली असते. विकेंड आला की, नवीन रुचकर पदार्थ खाण्यासाठी आपण घरातील महिलेकडे हट्ट धरतो.

अशावेळी घरात पाटवडी ही रेसिपी करता येईल. बेसनचा वापर करून आपण पाटवडी ही रेसिपी करू शकता. पाटवडी हा पदार्थ महाराष्ट्रात फार फेमस आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी कमी साहित्याची गरज लागते. यासह कमी वेळात तयार होते. त्यामुळे घरातील सदस्यांना काहीतरी हटके खाण्याची इच्छा झाली असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करा(This Weekend make Patwadi Recipe).

पाटवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

मिरची 

लसूण 

जिरं

उन्हाळ्यात एक ग्लास मसाला ताकाने ठेवा शरीराला कुल, आरोग्यासाठी उत्तम - चवीला चटकदार

ओवा 

खसखस 

तेल 

हिंग 

हळद 

मीठ 

बेसन 

सुकं खोबरं 

कोथिंबीर

या पद्धतीने बनवा खमंग पाटवडी

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात ४ ते ५ पोपटी रंगाच्या मिरच्या घ्या, त्यात १० ते १२ लसणाच्या पाकळ्या. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा घालून मिश्रण चांगले वाटून घ्या. पाण्याचा वापर न करता आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे. 

दुसरीकडे कढई गॅसवर गरम करत ठेवा, त्यात खसखस भाजून घ्या. खसखस भाजून झाल्यानंतर बाजूला काढून घ्या. आता कढईत ३ ते ४ टेबलस्पून तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरं, आलं - लसूण - मिरचीची पेस्ट, लो फ्लेमवर हे मिश्रण भाजून घ्या. मिश्रण भाजल्यानंतर त्यात पाव चमचा हिंग, हळद, घालून मिश्रण एकत्र करा. त्यानंतर दीड कप पाणी घाला. व चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात बेसन पीठ घालून चमच्याने ढवळत राहा. पिठाच्या गाठी होणार नाही याची काळजी घ्या. मिश्रण तयार झाल्यानंतर त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेऊन एक वाफ द्या.

दह्यात मीठ घालून खावे की साखर? तज्ज्ञ सांगतात काय फायद्याचं - कशाने बिघडते तब्येत

वड्या थापण्यासाठी प्लेट व वाटीला तेल लावून ग्रीस करा. प्लेटमध्ये बेसनचं तयार मिश्रण ओता व वाटीच्या मदतीने थापून घ्या. पीठ थोडं थंड झाल्यानंतर हाताने देखील थापू शकता. मिश्रण थापून झाल्यानंतर भाजलेली खसखस त्यावरून पेरून घ्या. खसखस वडीमध्ये चांगली बसली की, त्यावरून सुक्या खोबऱ्याचं किस व कोथिंबीर पसरवा. आता धारदार चाकूने लगेच वड्या कापून घ्या. अशा प्रकारे पाटवडी खाण्यासाठी रेडी. आपण ही वडी जेवणासोबत अथवा रस्सासोबत खाऊ शकता.   

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स