Join us  

२ टोमॅटो-कपभर तांदूळ, पाहा चटपटीत पण पौष्टीक डोशाची सोपी कृती, न आंबवता डोसा होईल काही मिनिटात रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2023 12:16 PM

This Weekend make Tomato dosa, no-ferment tangy and spicy dosa recipe : डाळ-तांदुळाचा डोसा नेहमीचाच, आता टोमॅटोचा डोसा करून पाहा, हेल्दी रेसिपी-खा पोटभर

आजकाल साऊथ इंडियन पदार्थांची (South Indian Food) क्रेझ वाढत चालली आहे. मुख्य म्हणजे नाश्तामध्ये लोकं आवडीने इडली, डोसा, मेदू वडा आणि उपमा खातात. डोशाचे अनेक प्रकार केले जातात. साधा, मसाला. मैसूर यासह इन्स्टंट रव्याचा डोसा आपण खाल्लाच असेल. पण कधी चटपटीत टोमॅटोचा डोसा (Tomato Dosa) खाऊन पाहिलं आहे का? टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे आहेत.

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, लाइकोपीन आणि बीटा-कॅरोटीन आढळतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. टोमॅटोचे अनेक पदार्थ केले जातात. टोमॅटोची चटणी, भाजी, शिवाय टोमॅटोचा वापर फोडणीमध्येही केला जातो. पण जर आपल्या रोजच्या प्रकारचा डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर, टोमॅटोचा चटपटीत हेल्दी डोसा (Cooking Tips) करून पाहा. हा डोसा करायला सोपा आणि झटपट तयार होतो(This Weekend make Tomato dosa, no-ferment tangy and spicy dosa recipe).

टोमॅटोचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

मसूर डाळ

लाल सुक्या मिरच्या

कुकर की कढई, कोणत्या भांड्यात जेवण शिजवल्याने आरोग्याला जास्त फायदा होतो? शरीरासाठी काय फायद्याचं?

पाणी

टोमॅटो

जिरं

आलं

मीठ

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप तांदूळ, एक कप मसूर डाळ, २ ते ४ लाल सुक्या मिरच्या व त्यात पाणी घालून तांदूळ धुवून घ्या. नंतर त्यात २ कप पाणी घाला, व त्यावर झाकण ठेऊन ४ ते ५ तासांसाठी भिजत ठेवा. ५ तासानंतर भिजलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. नंतर त्यात २ बारीक चिरलेले टोमॅटो, एक चमचा जिरं, एक इंच बारीक चिरलेलं आलं व थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

२ कप ज्वारीचा करा कुरकुरीत पौष्टीक डोसा, ग्लुटेन फ्री रेसिपी वेट लॉससाठी उत्तम-चवीला जबरदस्त

दुसरीकडे डोश्याच्या तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर ब्रशने थोडं तेल लावा, व त्यावर चमच्याने डोश्याचं पीठ पसरवून डोसा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे चटपटीत पण पौष्टीक डोसा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स