Lokmat Sakhi >Food > गाजर हलवा कधी जास्त शिजतो, गचका होतो? गाजर हलवा परफेक्ट जमण्यासाठी ही घ्या कृती

गाजर हलवा कधी जास्त शिजतो, गचका होतो? गाजर हलवा परफेक्ट जमण्यासाठी ही घ्या कृती

This winter make Halwai style gajar ka halwa at Home : हलवाई स्टाइल 'गाजर का हलवा' करण्याची सोपी कृती, हलवा होईल परफेक्ट-पसरेल घरभर घमघमाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2023 03:48 PM2023-12-12T15:48:46+5:302023-12-12T15:49:55+5:30

This winter make Halwai style gajar ka halwa at Home : हलवाई स्टाइल 'गाजर का हलवा' करण्याची सोपी कृती, हलवा होईल परफेक्ट-पसरेल घरभर घमघमाट

This winter make Halwai style gajar ka halwa at Home | गाजर हलवा कधी जास्त शिजतो, गचका होतो? गाजर हलवा परफेक्ट जमण्यासाठी ही घ्या कृती

गाजर हलवा कधी जास्त शिजतो, गचका होतो? गाजर हलवा परफेक्ट जमण्यासाठी ही घ्या कृती

'गाजर का हलवा' (Gajar ka Halwa) नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं ना? आधीच्या चित्रपटात गोड काहीतरी खाण्याची इच्छा झाली, की घरातील गृहिणी हमखास गाजराचा हलवा तयार करायची. किचनमध्ये हलवा तयार व्हायचा आणि त्याचा सुगंध घरभर पसरायचा. गाजराचा हलवा घरात तयार होतोय, हे लोकं त्याच्या दरवळणाऱ्या सुगंधावरून ओळखायचे. पण घरात तयार करताना हलवाई स्टाईल गाजराचा हलवा तयार होत नाही.

काही गृहिणी व्हिडिओ किंवा कुक बुक वाचून गाजराचा हलवा तयार करतात. पण तरीही गाजराचा हलवा मनासारखा तयार होत नाही. कधी त्याचा चिखल होतो, किंवा साहित्यांचे प्रमाण बिघडते (Cooking Tips). ज्यामुळे घरातील सदस्यही गाजराचा हलवा खाणं टाळतात. गाजराच्या सिझनमध्ये जर आपल्याला हलवा तयार करायचा असेल तर, ही रेसिपी नक्कीच करून पाहा. योग्य साहित्यात गोड परफेक्ट हलवा तयार होईल(This winter make Halwai style gajar ka halwa at Home).

हलवाई स्टाईल गाजराचा हलवा करण्यासाठी लागणारं साहित्य

तूप

गाजर

साखर

काजू

बदाम

दूध

खजूर

शाहरुखला आवडतो कॅटीनस्टाईल ब्रेड पकोडा, पाहा हा ब्रेड पकोडा कसा करतात, शाहरुखला आवडणारी चमचमीत रेसिपी

वेलची पावडर

खवा

कृती

सर्वप्रथम, पॅनमध्ये २ टेबलस्पून देशी तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात किसलेला गाजर घाला. गाजर खरेदी करताना नेहमी नारंगी किंवा लाल रंगाची विकत आणा, व आकराने जाड असणारी घ्या. शिवाय गाजर किसण्याआधी त्याची साल पीलरने काढून घ्या व धुवून घ्या, नंतर गाजर किसा. गाजराचा किस केल्यानंतर कॉटन टॉवेलवर पसरवून त्यातील अतिरिक्त पाणी पुसून घ्या. जेणेकरून गाजराचा चिखल होणार नाही.

पोळ्या उरल्या तर फेकू नका, मुठभर शेंगदाणे घालून करा चमचमीत फोडणीची पोळी, पौष्टीक रेसिपी-करायला सोपी

गाजराचा किस तुपात भाजून घेतल्यानंतर त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा, जेणेकरून गाजर वाफेवर शिजेल. ५ मिनिटानंतर त्यात अर्धा कप साखर घालून मिक्स करा. नंतर त्यात अर्धा कप दूध, अर्धा कप बिया काढून घेतलेले खजूर, अर्धा चमचा वेलची पावडर, बारीक चिरून घेतलेले काजू-बदाम घालून मिक्स करा. शेवटी अर्धा कप खवा घालून चमच्याने एकजीव करा. खवा आणि खजूर घातल्यामुळे याला हलवाईस्टाईल टेस्ट येईल. शिवाय कमी साखरेमुळे कॅलरीज देखील वाढणार नाही. अशाप्रकारे हलवाई स्टाईल गाजराचा हलवा खाण्यासाठी रेडी.

Web Title: This winter make Halwai style gajar ka halwa at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.