Join us  

कोवळ्या-हिरव्यागार मेथीचे करा खमंग ‘मेथी मुटके!’ मुलांच्या डब्यासाठी खुसखुशीत पौष्टिक पदार्थ, झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2023 3:52 PM

This Winter Season make Methiche Mutke-check out this special Crispy Recipe : मेथीची मुटके चवीला होतात भारी, पण मेथीचा कडवटपणा जात नाही, काय करावं बरं?

थंडीच्या दिवसात व्यायाम कमी पण खाण्याची इच्छा जास्त होते. हिवाळ्यात मसालेदार, क्रिस्पी, खमंग पदार्थ खाऊशी वाटतात. प्रत्येक ऋतूनुसार भाज्या, फळे खायला हवे. पण हेल्दी पदार्थ म्हटलं की लोकं नाकं मुरडतात. या दिवसात पाले भाज्या प्रचंड प्रमाणात मिळतात. मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर कमी दरात मिळतात. पाले भाज्यांचे आपण पराठे किंवा भाजी तयार करतो. मुख्य म्हणजे या दिवसात मेथीची भाजी, पराठे, मेथीचे खमंग मुटके (Methiche Mutke) आवर्जुन केले जातात.

मेथीचे मुटके चवीला भन्नाट लागतात, पण अनेकदा मेथीच्या कडवटपणामुळे मुटके चवीला कडू लागतात. जर मेथीचे मुटके चवीला कडू न होता, खमंग खुसखुशीत तयार व्हावे असे वाटत असेल तर, ही रेसिपी नक्की फॉलो करून पाहा. यामुळे मेथीचे मुटके चवीला कडू लागणार नाही, शिवाय चविष्ट खुसखुशीत तयार होतील(This Winter Season make Methiche Mutke-check out this special Crispy Recipe).

पौष्टीक मेथीचे खमंग मुटके करण्यासाठी लागणारं साहित्य(Methiche Mutke Recipe in Marathi)

मेथी

लसूण

हिरवी मिरची

आलं पेस्ट

हळद

लाल तिखट

मीठ

महाराष्ट्रीयन कढीला द्या ढाबास्टाईल तडका, पाहा बुंदी कढी करण्याची सोपी कृती, मारा फुरका- थंडीत जेवा दोन घास जास्त

साखर

धणे-जिरे पूड

हिंग

तेल

पांढरे तीळ

दही

गव्हाचं पीठ

बेसन

कृती

सर्वप्रथम, निवडून स्वच्छ धुवून घेतलेली कोवळी मेथीची पानं चिरून घ्या. मेथीची लहान कोवळी पानं चवीला कडू लागत नाही. एका बाऊलमध्ये चिरून घेतलेली मेथी घ्या. त्यात ठेचलेला लसूण, एक चमचा हिरवी मिरचीची पेस्ट, एक चमचा आल्याची पेस्ट, हळद, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, एक चमचा साखर, एक चमचा धणे-जिरे पूड, अर्धा चमचा हिंग, एक चमचा तेल आणि एक चमचा पांढरे तीळ घालून साहित्य एकजीव करा.

एक वाटी सुकं खोबरं-कपभर मखाणा, पाहा पौष्टीक लाडू करण्याची सोपी कृती, ना साखार-ना गुळ-ना तूप तरीही होतील चवीला जबरदस्त

नंतर त्यात २ चमचे फ्रेश दही, एक मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घालून हाताने मिक्स करा. शक्यतो मिक्स करताना पाण्याचा वापर टाळाच. पीठ मळून झाल्यानंतर हातावर थोडे तेल लावून घ्या. नंतर छोटे गोळे घेऊन त्याचे मुटके तयार करा. मुटके तयार करताना जास्त दाब देऊ नका. जेणेकरून मुटके आतून खुसखुशीत तयार होतील.

दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मुटके सोडून मंद आचेवर तळून घ्या. तळून झाल्यानंतर मुटके प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे गरमागरम खुसखुशीत खमंग मुटके खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स