Join us  

डाळ - तांदूळ भिजत घालण्याचं टेन्शन सोडा, २ कप रव्याचे करा टेस्टी टम्म फुगलेले - झटपट अप्पे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2023 2:56 PM

This Yummy Rava Appe Recipe Is Perfect For A Quick Weekday Breakfast ब्रेकफास्टला १० मिनिटात करा रव्याचे टम्म फुगलेले अप्पे, कमी साहित्यात झटपट होतात तयार

दाक्षिणात्य पदार्थ कोणाला आवडत नाही. मुख्य म्हणजे नाश्त्याला इडली, डोसा, मेदू वडे, अप्पे ही रेसिपी हमखास केली जाते. या पदार्थांचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. इडली-डोशाप्रमाणेच अप्पे आवडणाऱ्यांची यादी मोठी आहे. अप्पे करण्यासाठी डाळ - तांदूळ भिजत घालावे लागते. अप्पे करण्याची प्रोसेस फार मोठी आहे. पण आपल्याला झटपट अप्पे खाण्याची इच्छा झाली असेल तर, रव्याचे अप्पे ही रेसिपी ट्राय करून पाहा.

रव्याचे अप्पे कमी वेळात कमी साहित्यात तयार होतात. मुख्य म्हणजे ही रेसिपी लहानग्यांपासून थोरा - मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडेल. जर दिवसाची सुरुवात चवदार करायची असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(This Yummy Rava Appe Recipe Is Perfect For A Quick Weekday Breakfast).

रव्याचे अप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

दही

पाणी

तेल

मोहरी

जिरं

कांदा

गाजर

रव्यात अळ्या झाल्या? ४ उपाय, रव्यात अळ्या होणारच नाहीत, झालेल्या जातील पळून

मीठ

कोथिंबीर

इनो किंवा बेकिंग सोडा

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात २ कप रवा, २ वाटी फेटलेलं दही व थोडं पाणी घालून मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल, मोहरी व जिरं घाला. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर घालून भाजून घ्या. आपण यात आवडीनुसार भाज्या अॅड करू शकता. भाज्यांची ही फोडणी रव्याच्या मिश्रणात घालून मिक्स करा. त्यानंतर चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, इनो किंवा बेकिंग सोडा व त्यावर थोडं पाणी घालून मिश्रण मिक्स करा.

ना डाळी भिजत घालण्याची झंझट, ना वाटण्याचं टेन्शन, २ कप रव्यामध्ये घरीच करा - क्रिस्पी रव्याचे मेदू वडे..

आता अप्प्याच्या भांड्याला थोडं तेल लावून ग्रीस करा, भांडं गरम झाल्यानंतर त्यात रव्याचं बॅटर चमच्याने घाला. व त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा. २ मिनिटानंतर झाकण काढा, व अप्पे दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे रव्याचे अप्पे खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स