Lokmat Sakhi >Food > कलिंगड नैसर्गिक पद्धतीने पिकवले आहे की केमिकलने, कसे ओळखाल? ३ टिप्स - निवडा रसाळ कलिंगड

कलिंगड नैसर्गिक पद्धतीने पिकवले आहे की केमिकलने, कसे ओळखाल? ३ टिप्स - निवडा रसाळ कलिंगड

Three tips to pick out a sweet watermelon कलिंगड केमिकलने लाल केले जातात, जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2023 02:35 PM2023-05-01T14:35:22+5:302023-05-01T14:36:29+5:30

Three tips to pick out a sweet watermelon कलिंगड केमिकलने लाल केले जातात, जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते..

Three tips to pick out a sweet watermelon | कलिंगड नैसर्गिक पद्धतीने पिकवले आहे की केमिकलने, कसे ओळखाल? ३ टिप्स - निवडा रसाळ कलिंगड

कलिंगड नैसर्गिक पद्धतीने पिकवले आहे की केमिकलने, कसे ओळखाल? ३ टिप्स - निवडा रसाळ कलिंगड

उन्हाळ्यात चवीला गोड व शरीराला थंडावा देणाऱ्या कलिंगडाची मागणी वाढते. कलिंगडमध्ये सुमारे ९० टक्के पाणी असते, जे आपल्याला हायड्रेटेड आणि ताजे ठेवते. कलिंगड खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण काही लोकं या मागणीचा फायदा घेत, कच्चे कलिंगड केमिकलने लाल करतात. व बाजारात सर्रास विकतात.

हे कलिंगड दिसायला आकर्षक दिसतात. जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. जर केमिकलने पिकलेले कलिंगड ओळखायचं असेल तर, या काही सोप्या टिप्स फॉलो करा. याने कलिंगडमधील केमिकल लोचा लवकर ओळखून येईल. व नैसर्गिकरित्या पिकलेल्या कलिंगडाची ओळख तुम्हाला करता येईल.

सिटीग्रीन या वेबसाईटमध्ये कलिंगडाविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''दुकानदार कच्चे कलिंगड लवकर पिकवण्यासाठी ऑक्सीटोसिन या रसायनाचा वापर करतात. जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यामुळे, पोटदुखी व नर्वस ब्रेकडाउनसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय कलिंगड लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचाही वापर केला जातो. हे कलिंगड खाल्ल्याने डोकेदुखी किंवा कर्करोग देखील होऊ शकते''(Three tips to pick out a sweet watermelon).

अशा प्रकारे रासायनिक कलिंगड ओळखा

कलिंगडाची चव ओळखा

कलिंगड पिकवण्यासाठी अनेक केमिकलचा वापर होतो. केमिकल रसायने वापरल्याने त्याच्या गोड चवीवर परिणाम होतो. जलद गतीने पिकवलेले कलिंगड दिसायला लाल जरी असले तरी, चवीला गोड लागत नाही. कलिंगड विकत घेताना त्याची चव चाखून बघा. जर कलिंगड गोड नसेल तर, खरेदी करू नका.

२ कांदे - मुठभर शेंगदाण्याची करा चवदार चटणी, चव अशी की भाजी खायला विसराल

पाण्यात ठेवा कलिंगड

सर्वप्रथम, कलिंगडाचा एक छोटा तुकडा पॅनमध्ये ठेवा. त्यानंतर पॅनमध्ये पाणी घाला. काही वेळानंतर पाण्याचा रंग झपाट्याने बदलू लागला, तर त्यात रासायनिक किंवा कृत्रिम रंगांचा वापर करण्यात आला आहे, हे समजून जा.

आंबट - गोड चवीचं करा थंडगार कोकम सरबत, कमी वेळात - झटपट सरबत रेडी..

काही दिवस टेबलवर असेच ठेवा

२ ते ३ दिवसांसाठी कलिंगड टेबल किंवा जमिनीवर ठेवा. जर कलिंगड नैसर्गीकरित्या पिकले असेल तर, ते लवकर कुजणार नाही.  जर त्यात केमिकल रसायनांचा वापर केला असेल तर, ते लवकर खराब होईल. त्यामुळे असे कलिंगड खरेदी करणे टाळा.

Web Title: Three tips to pick out a sweet watermelon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.