Join us  

तीळ -खव्याची वडी, जुही परमारने शेअर केली संक्रांत स्पेशल रेसिपी, वडीसाठी हव्या फक्त ३ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 6:09 PM

Til Barfi Recipe Shared by Actress Juhi Parmar: अभिनेत्री शिल्पा शेट्टी पाठोपाठ आता जुही परमारनेही संक्रांत स्पेशल तिळाच्या वड्या सोप्या पद्धतीने कशा करायच्या, याची रेसिपी शेअर केली आहे. बघा नेमक्या कशा वड्या करतेय ती...

ठळक मुद्देफक्त ३ पदार्थ वापरून तयार केलेल्या या तिळाच्या वड्या चवदार असतील असं वाटतं. बघा रेसिपी. आवडली तर करून पाहायला हरकत नाही.

सर्वसामान्य घरांमध्ये जशी आता संक्रांतीची तयारी सुरू झाली आहे, तशीच तयारी आता सेलिब्रिटींच्या घरीही दिसून येत आहे. एकंदरीतच काय तर मकर संक्रांतीचा फिव्हर आता घराघरांत दिसत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने नुकतीच एक संक्रांत स्पेशल रेसिपी शेअर केली. त्यात तिने तिळापासून केलेले व्हाईट चॉकलेट ट्रफल्स करून दाखवले. तिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री जुही परमार (actress Juhi Parmar) हिने देखील एक रेसिपी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यात तिचे वडील तिळाच्या वड्या (Til Barfi Recipe) करताना दिसत आहेत. फक्त ३ पदार्थ वापरून तयार केलेल्या या तिळाच्या वड्या (Yummy delicious til burfi using just 3 ingredients) चवदार असतील असं वाटतं. बघा रेसिपी आवडली तर करून पाहायला हरकत नाही.

जुही परमारने शेअर केलेली तिळाच्या वड्यांची रेसिपीसाहित्य२ कप तीळ

दिड कप खवा

दिड कप साखर

दिड कप पाणी

 

कृती१. सगळ्यात आधी तीळ कढईमध्ये टाकून गॅसवर मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर ते थंड होऊ द्या.

२. तीळ थंड झाले की ते मिक्सरमध्ये टाकून त्याची जाडीभरडी पावडर करून घ्या. 

३. त्यानंतर कढईमध्ये टाकून खवादेखील चांगला परतून घ्या.

४. साखर आणि पाणी टाकून साखरेचा पाक तयार करा. पाक तयार झाला की त्यात परतून घेतलेला खवा आणि तिळाची पावडर टाका.

 

५. सगळं मिश्रण गरम असतानाच एकत्र करून घ्या. एका ताटलीला तुप लावा. त्यावर हे गरमागरम मिश्रण टाका आणि उचटणे वापरून पसरून घ्या. ही सर्व क्रिया वड्यांचं सारण गरम असतानाच करायची आहे. त्यामुळे ती अगदी झटपट करावी लागेल. वरतून खोबऱ्याच्या किसाची मस्त पेरणी केली की तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या वड्या कापा आणि त्याचा आस्वाद घ्या. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मकर संक्रांती