Join us  

फक्त १० मिनिटांत करा तिळगुळाचे पौष्टिक लाडू, झटपट रेसिपी - पाक चुकायची भीतीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 6:10 PM

Food And Recipe: ना गुळाचा पाक करण्याची कटकट, ना लाडू कडक होण्याचा धोका.. बघा तीळ- गुळाचे लाडू करण्याची सोपी रेसिपी. (til gul ladoo without jaggery pak)

ठळक मुद्देना गुळाचा पाक करण्याची कटकट, ना लाडू कडक होण्याचा धाेका.. बघा झटपट होणाऱ्या तीळगुळाच्या लाडवांची ही सोपी रेसिपी

संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे घरोघरी तीळ- गुळाचे लाडू, वड्या, तीळ- गुळाच्या चवदार खमंग पोळ्या करण्याची तयारी सुरू झालेली असणार. गुळाचा पाक करून तिळाचे लाडू करण्याची पद्धत (Til gul ladoo recipe) जरा अवघड आहे. अशा पद्धतीने केलेले लाडू काही जणींचे खूप कडक होतात किंवा गुळाच्या पाकाचे अचूक प्रमाण जमत नाही. त्यामुळे लाडू नीट वळता येत नाही. म्हणूनच यंदा या सोप्या पद्धतीने तिळाचा लाडू करून बघा (How to make til gul ladoo within 10 minutes). ना गुळाचा पाक करण्याची कटकट, ना लाडू कडक होण्याचा धाेका.. बघा झटपट होणाऱ्या तिळगुळाच्या लाडवांची ही सोपी रेसिपी (Easy and quick recipe of til gul ladoo).

कसे करायचे तीळ गुळाचे लाडू?साहित्य१ वाटी तीळपाव वाटी शेंगदाणे

४८ हजारांच्या ऑर्गेंझा साडीवर गज्जी सिल्कचं आकर्षक ब्लाऊज, बघा समंथा प्रभुचा स्टायलिश लूक... १ वाटी गुळाची पावडर४ ते ५ टेबलस्पून तूप

 

रेसिपी१. सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई तापली की त्यात तीळ टाकून ते मंद आचेवर दिड ते दाेन मिनिटे भाजून घ्या.

पार्लरमध्ये न जाता घरच्याघरी जेल नेलपेण्ट कसे काढायचे? फक्त ५ सोप्या स्टेप्स; झटपट उपाय

२. त्यानंतर कढईतून तीळ काढून घ्या आणि शेंगदाणे टाकून ते ही मंद आचेवर दिड ते दोन मिनिटे भाजून घ्या.

 

३. भाजलेले तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात गूळ आणि तूप देखील टाका. आणि सगळे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. 

मुलांचं टीव्ही- मोबाईलचं वेड कमी करण्यासाठी काय करावं कळेना? बघा ३ उपाय- वाचा तज्ज्ञांचा सल्ला

४. आता हाताला थोडेसे तूप लावून या मिश्रणाचे लाडू वळा.

५. अतिशय चवदार असे झटपट हाेणारे तीळ- गुळाचे लाडू तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मकर संक्रांती