Join us  

थंडीत १० मिनिटात करा तिळाचे पौष्टीक लाडू; सोपी रेसिपी, लाडू तोंडात टाकताच विरघळतील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 3:15 PM

Til ke Laddu : तिळाचे लाडू कधी जास्त टणक होतात तर कधी वातड. परफेक्ट तिळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (Healthy immunity booster til laddu recipe)

थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता टिकून राहावी यासाठी  गरम पदार्थांचे सेवन केले जाते. मेथीचे, आळशीचे लाडू हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आवर्जून खाल्ले जातात. याबरोबरच आवडीनं खाल्ले जाणारे लाडू म्हणजे तिळाचे लाडू. (Cooking Tips) तिळाचे लाडू खायला स्वादीष्ट तितकेच पौष्टीक असतात. तिळाचे लाडू कधी जास्त टणक होतात तर कधी वातड. परफेक्ट तिळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (Healthy immunity booster til laddu recipe)

तिळाचे लाडू कसे बनवायचे (How to make perfect til laddu)

१) सगळ्यात आधी एक पॅनगरम करून घ्या. त्यात तिळ चांगले भाजून घ्या.

२) नंतर पॅनमध्ये थोडं पाणी घालून गूळ घाला. गूळ वितळेपर्यंत मंच आजेवर शिजवा.

३) त्यानंतर वितळेल्या गुळात पाणी आणि तीळ, गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि मिश्रण थोडं गार झाल्यानंतर लाडू वळून घ्या. लाडू वळताना हाताला थोडं तेल लावा. हाताला चटका लागणार नाही याची काळजी घ्या.

४) तुम्ही यात ड्रायफ्रुट्स, शेंगदाण्याचे कापही  घालू शकता.  

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स