Lokmat Sakhi >Food > संक्रातीला केलेले तिळाचे लाडू महिनाभर टिकतील, घ्या कपभर तिळाची सोपी रेसिपी-कडकही होणार नाहीत

संक्रातीला केलेले तिळाचे लाडू महिनाभर टिकतील, घ्या कपभर तिळाची सोपी रेसिपी-कडकही होणार नाहीत

Til Ladoo Recipe - Homemade Til Gud Ke Laddu : मकर संक्रांत स्पेशल : तिळाचा एक लाडू रोज खा, हाडं होतील बळकट - केस होतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 01:53 PM2024-01-12T13:53:18+5:302024-01-12T13:53:46+5:30

Til Ladoo Recipe - Homemade Til Gud Ke Laddu : मकर संक्रांत स्पेशल : तिळाचा एक लाडू रोज खा, हाडं होतील बळकट - केस होतील सुंदर

Til Ladoo Recipe - Homemade Til Gud Ke Laddu | संक्रातीला केलेले तिळाचे लाडू महिनाभर टिकतील, घ्या कपभर तिळाची सोपी रेसिपी-कडकही होणार नाहीत

संक्रातीला केलेले तिळाचे लाडू महिनाभर टिकतील, घ्या कपभर तिळाची सोपी रेसिपी-कडकही होणार नाहीत

'तीळ गुळ घ्या अन् गोड गोड बोला' म्हणत वर्षातला पहिला सण जवळ आला. मकर संक्रांतीनिमित्त (Makar Sanskranti 2023) काही महिला आणि मुली काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात, व घरोघरी किंवा आपल्या जिवलगांना तीळगुळ आणि तिळाचे लाडू देऊन शुभेच्छा देतात. तिळ आणि गुळाला विशेष महत्त्व असलेला हा सण तिळाच्या लाडवांशिवाय अपूर्ण आहे.

काही गृहिणी घरात तिळाचे लाडू तयार करतात, तर काही जण विकतचे लाडू आणतात. पण विकतच्या लाडवांना घरातली चव येत नाही, एवढं मात्र खरं. काही लोकांचे लाडू कडक होतात, किंवा तयार करताना साहित्य आणि माप चुकते. तर काही जणांचे लाडू करताना मऊ तयार होतात, पण काही कालावधीनंतर ते कडक होतात (Tilache laddoo). महिनाभर लाडू मऊ राहावे, शिवाय करताना कडक होऊ नये, असे वाटत असेल तर, लाडू करताना एक ट्रिक लक्षात ठेवा. काही मिनिटात महिनाभर पुरतील इतके लाडू झटपट तयार होतील(Til Ladoo Recipe - Homemade Til Gud Ke Laddu).

तिळाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य(Tilache Ladoo Recipe)

२ कप तीळ

२ कप गुळ

ना गॅस-ना तेल, ५ मिनिटात धुराचा कांदा करण्याची सोपी कृती, तोंडी लावण्यासाठी ताटात हवीच

१ कप शेंगदाणे

तूप

कृती

सर्वप्रथम, गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात एक कप शेंगदाणे घालून भाजून घ्या. भाजलेले शेंगदाणे एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर हाताने शेंगदाण्याचे फोलपाटे काढून घ्या, व ग्लास किंवा वाटीने शेंगदाण्याचा जाडसर कूट तयार करा. नंतर कढईत २ कप पांढरे तीळ घालून भाजून घ्या. तीळ तडतडल्यानंतर, शिवाय त्याचा रंग बदलल्यानंतर एका ताटात पसरवून ठेवा. जेणेकरून भाजलेले तीळ थंड होतील.

ना पोळपाट ना लाटणं, वाटीने करा एकावेळी दोन गोल पोळ्या एकदम झटपट

तीळ भाजून घेतल्यानंतर कढईत २ कप किसलेला गुळ घाला, गॅसची फ्लेम हाय ठेवा. जेणेकरून गुळ लवकर वितळेल. गुळ वितळल्यानंतर त्यात एक चमचा तूप घालून मिक्स करा. तूप गुळात मिक्स केल्यानंतर त्यात २ चमचे पाणी घाला, पाण्यामुळे गुळाचा पाक व्यवस्थित तयार होईल. पाक तयार झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात शेंगदाण्याचं कूट, भाजलेले तीळ घालून चमच्याने एकजीव करा.

साहित्य मिक्स केल्यानंतर गॅस बंद करा. लाडू वळताना हाताला चटके बसू नये असे वाटत असेल तर, एका बाऊलमध्ये थंड पाणी घ्या, त्यात आधी हात बुडवून, मग चमच्याने हातावर मिश्रण घेऊन लाडू वळवून तयार करा. अशा प्रकारे खुसखुशीत महिनाभर टिकणारे तिळाचे लाडू खाण्यासाठी रेडी. हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवल्यास लाडू महिनाभर टिकतील, शिवाय कडक होणार नाही.

Web Title: Til Ladoo Recipe - Homemade Til Gud Ke Laddu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.