Lokmat Sakhi >Food > फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर कणीक काळं पडतं? १ ट्रिक, २ दिवस फ्रेश राहील कणीक, मऊ होतील चपात्या

फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर कणीक काळं पडतं? १ ट्रिक, २ दिवस फ्रेश राहील कणीक, मऊ होतील चपात्या

Right Way To Store Wheat Atta In Fridge : तुम्ही चपातीचं कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवणार असाल आणि अनेक तासानंतर चपात्या करणार असाल तर  फ्रिजमध्ये पीठ ठेवण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 09:10 PM2024-10-06T21:10:21+5:302024-10-06T22:10:31+5:30

Right Way To Store Wheat Atta In Fridge : तुम्ही चपातीचं कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवणार असाल आणि अनेक तासानंतर चपात्या करणार असाल तर  फ्रिजमध्ये पीठ ठेवण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

Tips And Tricks Chapati Dough Turns Black In Fridge Know Right Way To Store Atta In Fridge | फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर कणीक काळं पडतं? १ ट्रिक, २ दिवस फ्रेश राहील कणीक, मऊ होतील चपात्या

फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर कणीक काळं पडतं? १ ट्रिक, २ दिवस फ्रेश राहील कणीक, मऊ होतील चपात्या

जेव्हा तुम्ही कणीक मळून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवता तेव्हा वेळेची बचत होते आणि  चपात्या करण्यासाठी सतत पीठ मळावं लागत नाही. (Cooking Hacks) पण अनेकजण फ्रिजमध्ये पीठ मळून ठेवतात तेव्हा कणीक काळं पडतं आणि वास येऊ लागतो. ही समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. (Right Way To Store Wheat Atta In Fridge)

जर तुम्ही चपातीचं कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवणार असाल आणि अनेक तासानंतर चपात्या करणार असाल तर  फ्रिजमध्ये पीठ ठेवण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ज्यामुळे पीठ काळं पडणार नाही आणि पीठ  एक ते दोन दिवस ताजं राहील. (Tips And Tricks Chapati Dough Turns Black In Fridge Know Right Way To Store Atta)

चपातीचे पीठ काळे पडू नयेत यासाठी खास टिप्स

1) चपातीचं पीठ ताजं  ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसं की पीठ मळून झाल्यानंतर एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा. ज्यामुळे कणीक फ्रिजची हवा आणि मॉईश्चरच्या संपर्कात येणार नाही आणि त्याचा रंगही बदलणार नाही. तुम्ही चपातीचं पीठ ज्या डब्यात ठेवत आहात तो पूर्णपणे कोरडा असेल याची खात्री करा.

2) तुम्ही चपातीचं कणीक प्लास्टीकमध्ये रॅपमध्ये गुंडाळून ठेवू शकता. यासाठी तुम्ही जिप लॉकचा वापर करू शकता. सामान्य पॉलिथिनमध्ये ठेवल्यास पूर्णपणे  झाकून ठेवा. 

3) चपातीच्या पीठाला तेल किंवा तूप लावून मळून ठेवा. बाहेरच्या भागाला तेल किंवा तूप लावा. हे केल्यानं कणीक ऑक्सिडाईज होणार नाही आणि दीर्घकाळ फ्रेश राहतील. तेल लावल्यास पीठ सुकत नाही.

4) चपातीचं पीठ साठवताना फ्रिजचं तापमान योग्य असावं. २ ते ४ डिग्री सेल्सियस तापमानात कणीक स्टोअर केल्यास उत्तम ठरते जर तापमान जास्त असेल तर पीठ लवकर खराब होऊ शकते. 

5) मळलेल्या पीठाला व्यवस्थित व्यवस्थित स्टोअर केलं तर २४ तासांपेक्षा अधिक स्टोअर करू शकता. या पद्धतीने कणीक ठेवल्यास  चपात्या ताज्या राहतील. 

Web Title: Tips And Tricks Chapati Dough Turns Black In Fridge Know Right Way To Store Atta In Fridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.