Join us  

कुकरच्या झाकणातून पाणी फसफसून बाहेर येतं, शिट्टी होत नाही? ५ सुपर ट्रिक्स; पदार्थ लवकर शिजेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 10:09 PM

Tricks Does Pulses Rice Water Come Out From Pressure Cooker : शिट्टीतून बाहेर उडालेलं पाणी, वरण साफ करण्यात बराचवेळ निघून जातो. प्रेशर कुकरच्या वापर सावधगिरीनं करायला हवा.

प्रेशर कुकरचा (Pressure Cooker)  वापर फक्त कुकिंगसाठीच केला जात नाही तर जेवणाची चव वाढवण्यासाठीही कुकरमुळे मदत होते. आहारतज्ज्ञ सल्ला देतात की प्रेशर कुकरचा वापर जास्तीत जास्त फायदेशी ठरू शकतो. जे लोक नवीन कुकर घेतात त्यांना छोट्या छोट्या त्रासांचा सामना करावा लागतो. शिट्टी घेताना त्यातून पाणी-तांदूळ बाहेर येणं अशी समस्या उद्भवते. शिट्टीतून डाळ-तांदूळ बाहेर आल्यामुळे स्टोव्ह आणि आजूबाजूचे भिंती खराब होते.  शिट्टीतून बाहेर उडालेलं पाणी, वरण साफ करण्यात बराचवेळ निघून जातो. प्रेशर कुकरच्या वापर सावधगिरीनं करायला हवा. ( Tips And Tricks Does Pulses Rice Water Come Out From Pressure Cooker Whistle Blows Does Not Make This Mistake)

कुकरमधून पाणी बाहेर का येतं?

विनोद स्टेनलेस स्टिलच्या रिपोर्टनुसार रबर गॅस्केट लूज  झालंय की नाही ते तपासा.  कोणतेही अन्न शिजवताना प्रेशर कुकर ओव्हर फ्लो करू नका, चांगल्या ब्रॅण्डचे कुकर विकत घ्या. जर कुकमध्ये जास्त पाणी घातलं तर शिजताना हे पाणी बाहेर येऊ शकतं. कुकरचं रबर किंवा सिलिंग योग्य पद्धतीने सेट न झाल्यास कुकरमधलं पाणी बाहेर येतं. जर प्रेशर कुकरच्या वेट पाईपमध्ये काही अडकलं असे आणि वाफ निघायला त्रास होत असेल तर अधिक समस्या येऊ शकते.  कुकरच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात डाळ-तांदूळ घातल्यानंही पाणी बाहेर येऊ शकतं. 

कुकर कसा साफ करावा?

सगळ्यात आधी कुकर थंड होऊ द्या. त्यानंतर कुकच्या आतलं प्रेशर  कमी होण्याची वाट पाहा जेणेकरून कुकर साफ करणं सोपं आणि  सुरक्षित होईल. कुकरची रिंग जुनी झाली असेल तर वेळीच बदला. वेट पाईपमध्ये काही अडकलं असेल आणि पातळ पदार्थ म्हणजे टुथपिकनं स्वच्छ करा. कुकरच्या बाहेरून साफ-सफाई करण्यासाठी एक कापड साबणाच्या पाण्यात बुडवून घ्या. त्यानंतर डाग व्यवस्थित स्वच्छ करा.

कुकरचा वापर करताना या गोष्टींची काळजी घ्या

जेव्हा स्वंयपाक कराल तेव्हा कुकरमध्ये जास्त पाणी घालू नका. पाणी नेहमी अर्ध्यापेक्षा थोडं जास्त असावं. सिलिंग रिंग नेहमी तपासत राहा.  गरज पडल्यास बदलून घ्या. ज्यामुळे प्रेशर कुकरमध्ये व्यवस्थित प्रेशर येण्यास मदत होईल.

कुकरमध्ये इतकंच साहित्य घाला जितकी त्याची क्षमता असेल. छोट्या कुकरमध्ये  जास्त जेवण बनवलं  तर अन्न बाहेर येण्याचा धोका असतो. जेव्हाही तुम्ही कुकरचा वापर कराल तेव्हा वेट पाईट स्वच्छ करा.  ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवणार नाहीत. कुकरचा  वापर करताना तांदूळ बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.